Rapper Raftaar Wedding : 2 वर्ष डेट केल्यानंतर रॅपर रफ्तार पुन्हा एकदा चढला बोहल्यावर, कोण आहे दुसरी बायको?

Last Updated:

Rapper Raftaar Second Marriage: सुप्रसिद्ध गायक आणि रॅपर रफ्तार सध्या त्याच्या दुसऱ्या लग्नामुळे चर्चेत आला आहे.

सुप्रसिद्ध गायक आणि रॅपर रफ्तार सध्या त्याच्या दुसऱ्या लग्नामुळे चर्चेत आला आहे.
सुप्रसिद्ध गायक आणि रॅपर रफ्तार सध्या त्याच्या दुसऱ्या लग्नामुळे चर्चेत आला आहे.
Rapper Raftaar Second Marriage: सुप्रसिद्ध गायक आणि रॅपर रफ्तार सध्या त्याच्या दुसऱ्या लग्नामुळे चर्चेत आला आहे. रफ्तारने २०१६ साली कोमल वोहराशी लग्नगाठ बांधली होती. मात्र काही कारणांमुळे त्यांचं हे नात जास्त काळ टिकू शकलं नाही. यानंतर २०२१ साली त्यांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला. दरम्यान रफ्तार दुसऱ्यांना लग्नबंधनात अडकल्याच्या बातम्या समोर येत आहे. त्याच्या लग्नातील फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले आहेत.
रफ्तारने त्याच्या अधिकृत सोशल मिडिया अकाऊंटवर त्याच्या लग्नाचे कोणतेही फोटो शेअर केलेले नाही. अशा परिस्थितीत त्याच्या लग्नाच्या फोटोंनी सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. चाहते त्याला लग्नाच्या शुभेच्छा देत आहेत. चाहत्यांना हे जाणून घ्यायचं आहे की रफ्तारने खरोखरच दुसऱ्यांदा लग्न केलं आहे का? हे फोटो वेगाने व्हायरल झाले आहेत.
advertisement
रॅपर रफ्तारने फॅशन स्टायलिस्ट मनराज जवंदासोबत लग्न केलं आहे. दरम्यान, या दोघांनीही लग्नाचे कोणतेही फोटो शेअर केले नाहीत. मात्र समोर आलेल्या फोटोंमध्ये दोघेही खूपच आनंदी दिसत आहेत. रफ्तारच्या लग्नाच्या फोटोंनी सोशल मीडियावर खळबळ उडवली आहे. याआधी त्यांच्या लग्नाची पत्रिकाही सोशल मीडियावर व्हायरल झाली होती, ज्यात रफ्तार आणि मनराजचे नाव लिहिले होते.
advertisement
रॅपर रफ्तारचं खरं नाव दिलिन नायर आहे. त्याने ३१ जानेवारी २०२५ ला कुटुंबिय आणि जवळच्या मित्रपरिवाराच्या साक्षीने लहान समारंभात दाक्षिणात्य पद्धतीने लग्न केलं आहे. तो आणि त्याची पत्नी सोनेरी रंगाच्या पारंपारिक पेहरावात दिसत आहेत. फोटोमध्ये रफ्तार मनराजला मंगळसूत्र घालताना आणि तिच्याकडे प्रेमाने बघताना दिसत आहे. दोघेही यावेळी खूपच आनंदी दिसत आहेत.
advertisement
काही रिपोर्ट्समध्ये दिलेल्या माहितीनुसार रफ्तार आणि मनराज २०२३ पासून एकमेकांना डेट करत आहेत. जवळपास दोन वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर त्यांनी आज ३१ जानेवारी २०२५ ला लग्न केले आहे.
view comments
मराठी बातम्या/ बातम्या/बातम्या/
Rapper Raftaar Wedding : 2 वर्ष डेट केल्यानंतर रॅपर रफ्तार पुन्हा एकदा चढला बोहल्यावर, कोण आहे दुसरी बायको?
Next Article
advertisement
OTT Movie: बोल्ड सीन्सने भरलेला सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका; 2 तास 28 मिनिटांची कहाणी ओटीटीवर हिट
2 तास 28 मिनिटांचा बोल्ड सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका
    View All
    advertisement