Kalyan Crime : फटाक्यांवरून वादाची ठिणगी, बाप-लेकासोबत घडलं भयंकर, CCTV मध्ये दिसली संपूर्ण घटना...

Last Updated:

Kalyan Crime : कल्याण स्टेशन परिसरातील अमर पॅलेस लेडीज बारच्या कर्मचाऱ्यांनी फटाक्यांच्या वादावर बाप आणि मुलाला बेदम मारहाण केली. घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली

News18
News18
कल्याण : कल्याण स्टेशन परिसरातील अमर पॅलेस लेडीज बारच्या वॉचमन आणि त्याच्या साथीदारांनी केलेली दादागिरी परिसरात खळबळ उडवून दिली आहे. घटनेत वडील आणि मुलगा गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही मारहाण इतकी गंभीर होती की परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
नेमक घडले तरी काय?
मिळालेल्या माहितीप्रमाणे, पीडित वडील आणि त्यांचा मुलगा आपल्या घराच्या समोरील रस्त्यावर उभे होते. या दरम्यान त्यांच्या घराजवळल फटाके उडवले जात होते. या संदर्भात वडील-लेक बारच्या कर्मचाऱ्यांना विनम्रपणे फटाक्यांची ठिणगी उडाल्याच्या जाब विचारण्यासाठी गेले होते.मात्र, विचारलेला जाब सांगण्याऐवजी बारच्या वॉचमनने आपली ताकद दाखवण्याचा निर्णय घेतला.
वॉचमन आणि त्याचे साथीदार अचानकच रागावले आणि पीडितांवर हल्ला केला. मारहाण इतकी भयंकर होती की वडील आणि मुलगा गंभीर जखमी झाले असून या मारहाणीदरम्यान त्यांच्या पाय आणि हातांवर गंभीर जखमा झाल्या तसेच चेहऱ्यावरही गंभीर इजा झाली. मारहाणीची ही संपूर्ण घटना बारच्या बाहेर लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. सीसीटीव्हीतील दृश्ये पाहून परिसरातील नागरिकही घाबरले आणि तातडीने संपू्र्ण घटनेची माहिती पोलिसांना कळवण्यात आली.
advertisement
घटनेनंतर पीडित कुटुंबाने महात्मा फुले पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि आरोपींचा शोध घेण्यास सुरुवात केली. पोलिसांनी या प्रकरणात वॉचमन आणि त्याच्या सहकाऱ्यांविरोधात गंभीर कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे.
सदर घटनेमुळे कल्याण स्टेशन परिसरात नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अनेकांनी म्हटले की अशा प्रकारच्या दादागिरीला आता पूर्णपणे थारा देण्याची गरज आहे, अन्यथा नागरिकांचा विश्वास स्थानिक प्रशासनावर कमी होईल.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/ठाणे/
Kalyan Crime : फटाक्यांवरून वादाची ठिणगी, बाप-लेकासोबत घडलं भयंकर, CCTV मध्ये दिसली संपूर्ण घटना...
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement