Tilak Varma : 'माझा जीव गेला असता...', तिलक वर्माला झाला होता गंभीर आजार! म्हणाला 'आईसमोर माझ्या डोळ्यात पाणी आलं...'

Last Updated:

Tilak Varma Rare Disorder : मी शतक पूर्ण करण्यासाठी जोर लावला, तेव्हा माझ्या डोळ्यातून पाणी येऊ लागले. माझी बोटे अजिबात हलत नव्हती, असं तिलक वर्मा म्हणाला.

Tilak Varma life threatening serious illness
Tilak Varma life threatening serious illness
Tilak Varma life threatening serious illness : आशिया कप फायनलचा हिरो तिलक वर्मा याने नुकतंच एका मुलाखतीत धक्कादायक अनुभव शेअर केला. 'ब्रेकफास्ट विथ चॅम्पियन्स' या कार्यक्रमात गौरव कपूर यांच्याशी बोलताना तिलक वर्माने धक्कादायक अनुभव शेअर केला. जेव्हा एका मॅचदरम्यान त्याच्या स्नायूंमध्ये इतका तीव्र कडकपणा आला की, त्यांना थेट मैदानावरून हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं होतं. तिलक वर्मा याला एक गंभीर आजार झाला होता. त्यामुळे त्याचा जीव देखील गेला असता. तिलक वर्मा याने बीसीसीआय आणि आकाश अंबानी यांचे आभार मानले.

मला रॅबडोमायोलिसिस नावाच्या आजाराचे निदान

तिलक वर्मा म्हणतो की, मी यापूर्वी कधीच याबद्दल कोणाशीही बोललो नव्हतो किंवा काही सांगितलं नव्हतं. आयपीएलच्या माझ्या पहिल्या सीझननंतर मला काही आरोग्य समस्या जाणवल्या आणि मला फिट राहायचं होतं. या गोष्टी बाहेर आल्या नाहीत, पण मला 'रॅबडोमायोलिसिस' (Rhabdomyolysis) नावाच्या आजाराचे निदान झालं होतं, ज्यामध्ये स्नायू तुटतात, असं तिलक म्हणाला.
advertisement

मी 'आइस बाथ' करत होतो, पण माझ्या शरीराला...

आरामच्या दिवशी देखील मी जिममध्ये जायचो आणि मला जगातील सर्वात फिट खेळाडू तसेच फील्डर बनायचे होते, त्यामुळे मी माझ्या रिकव्हरीकडे जास्त लक्ष देत नव्हतो. मी 'आइस बाथ' करत होतो, पण माझ्या शरीराला पूर्णपणे बरे होण्यासाठी वेळ देत नव्हतो. विश्रांतीच्या दिवसातही मी स्वतःवर खूप जोर देत होतो, ज्यामुळे स्नायूंवर गरजेपेक्षा जास्त ताण पडला आणि तुटले आणि नसा खूप कडक झाल्या होत्या, असंही तिलक म्हणाला.
advertisement

माझी बोटे अजिबात हलत नव्हती...

बांगलादेशमध्ये 'ए सीरिज' खेळत असताना मी शतक पूर्ण करण्यासाठी जोर लावला, तेव्हा माझ्या डोळ्यातून पाणी येऊ लागले. माझी बोटे अजिबात हलत नव्हती आणि सर्व काही इतके कडक झाले होते की, जणू ते दगडच आहेत. मला 'रिटायर हर्ट' व्हावे लागले आणि बोटे हलत नसल्यामुळे ग्लोव्हज कापावे लागले. यानंतर लगेच मला आकाश अंबानी यांचा फोन आला आणि त्यांनी बीसीसीआयशी बोलून मला खूप मदत केली, असं म्हणत त्याने आकाश अंबानी, जय शहा आणि बीसीसीआयचे आभार मानले आहेत.
advertisement

माझी आई माझ्यासोबत होती, पण नंतर...

दरम्यान, मॅचनंतर मला त्वरित हॉस्पिटलमध्ये ऍडमिट (Admit) करण्यात आले आणि डॉक्टरांनी मला सांगितले की, जर मी काही तास उशीर केला असता, तर याचे परिणाम खूप भयानक झाले असते आणि माझा जीवही जाऊ शकला असता. माझी आई माझ्यासोबत होती, पण नंतर हळूहळू परिस्थितीत सुधारणा झाली आणि मी बरा झालो, असं तिलक वर्माने म्हटलं आहे.
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Tilak Varma : 'माझा जीव गेला असता...', तिलक वर्माला झाला होता गंभीर आजार! म्हणाला 'आईसमोर माझ्या डोळ्यात पाणी आलं...'
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement