Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
कुर्नूलजवळ Kaveri Travels बसला भीषण आग लागून 20 प्रवासी मृत्युमुखी, 12 जखमी. Hyderabad-Bengaluru मार्गावर अपघात, रेवंत रेड्डी यांनी शोक व्यक्त केला.
पुन्हा तीच अंधारी रात्र, भरधाव ट्रॅव्हल्स, गावी निघालेले लोक आणि तीच घटना पुन्हा एकदा घडली आहे. 8 दिवसांपूर्वीच जोधपूरमध्ये धावत्या बसने अचानक पेट घेतला आणि 20 प्रवासी जळून खाक झाले होते. तीच घटना पुन्हा एकदा घडली आहे. भरधाव खासगी बसने अचानक पेट घेतला आणि 20 प्रवासी जळून खाक झाले. प्रवासी साखर झोपेत असताना अचानक बसने पेट घेतला, काही कळण्याच्या आतच गोंधळ उडाला. जीव वाचवण्यासाठी कुठे दाराकडे धावलं तरी कुणी इमर्जन्सी एक्झिटमधून बाहेर निघण्यासाठी धडपड करू लागलं.
काही क्षणातच आगीचा भडका उडाला आणि संपूर्ण बस आगीच्या भक्ष्यस्थानी होती. ज्वाळा इतक्या भयंकर होत्या की आजूबाजूच्या स्थानिकांनाही मदत करणं कठीण होत होतं. जीव वाचवण्यासाठी बसमधून लोक ओरडत होते. किंकाळ्या ऐकू येत होत्या. काळीज चिरणारा आक्रोश महामार्गावर रात्री उशीरा स्थानिकांनी पाहिला. संपूर्ण बस जळून खाक झाली, फक्त सांगाडा उरला. ही आग इतकी भीषण होती की त्यात सारं काही जळून बेचिराख झालं.
advertisement
ही धक्कादायक घटना आंध्र प्रदेशातील कुर्नूल इथे घडली आहे. बसला आग लागेल्या घटनेत अनेक जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. कावेरी ट्रॅव्हल्स या बसला आग लागली. पोलिसांच्या माहितीनुसार, अपघाताच्या वेळी चालक आणि सहाय्यकासह ४२ जण होते. एसपींनी सांगितले की, दुचाकीला धडक दिल्यानंतर बसने आग लावली. आतापर्यंत 12 जणांना रुग्णालयात हलवण्यात आले आहे. सध्या आग आटोक्यात आणण्यात आली आहे. कूलिंगचे काम सुरू आहे.
advertisement
కర్నూలు జిల్లాలో దారుణం జరిగింది. ఘోర అగ్ని ప్రమాదం జరిగింది. హైదరాబాద్ నుంచి బెంగళూరు వెళ్తున్న కావేరి ట్రావెల్స్ బస్సు కర్నూలు శివారు చిన్నటేకూరులో అగ్ని ప్రమాదానికి గురైంది. ఈ ఘటనలో 25 మందికి పైగా సజీవదహనం అయ్యారు.#Kurnool #BusAccident #AndhraPradesh pic.twitter.com/r7yiSxw1TS
— kotlata (@kotlataweb) October 24, 2025
advertisement
A Volvo bus from #Hyderabad to #Bengaluru caught fire on NH-44 in Kurnool at around 3:30 AM after a two-wheeler hit and got stuck under it. 40+ onboard; around 15 rescued & hospitalised. Around 25+ feared dead, verification underway.#AndhraPradesh https://t.co/j1vyH1Uchz pic.twitter.com/TR6KLKMqPG
— Ashish (@KP_Aashish) October 24, 2025
advertisement
आतापर्यंत 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला आहे. पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास ही भीषण आग लागली. पहाटे तीन वाजता अनेक प्रवासी झोपत होते त्यामुळे त्यांना काय झालंय हे कळण्याच्या आतच आगीने आपलं रौद्र रुप धारण केलं. तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी या अपघाताबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले. मुख्यमंत्र्यांनी मृतांच्या कुटुंबियांना मनापासून संवेदना व्यक्त केल्या. त्यांनी राज्य अधिकाऱ्यांना आंध्र प्रदेश अधिकाऱ्यांशी समन्वय साधून आवश्यक मदत उपाययोजना करण्याचे निर्देश दिले.
advertisement
त्यांनी राज्याचे मुख्य सचिव के. रामकृष्ण राव आणि पोलिस महासंचालक (डीजीपी) बी. शिवधर रेड्डी यांच्याशी अपघाताबाबत चर्चा केली आणि तातडीने हेल्पलाइन सुरू करण्याची सूचना केली. गडवाल जिल्हाधिकाऱ्यांना आणि पोलिस अधीक्षकांना (एसपी) अपघातस्थळी भेट देण्याच्या सूचना देण्यात आल्या.
view commentsLocation :
Andhra Pradesh
First Published :
October 24, 2025 7:20 AM IST
मराठी बातम्या/देश/
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO


