नियतीचा क्रूर खेळ! 10 वर्षांच्या मुलाचा 'हार्ट अटॅक'ने मृत्यू, आईच्या मांडीवर सोडला जीव
- Published by:Arjun Nalavade
Last Updated:
Satara News : कोडोली गावातून एक मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. बुधवारी रात्री श्रावण अजित गावडे नावाच्या अवघ्या 10 वर्षांच्या...
Satara News : कोडोली गावातून एक मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. बुधवारी रात्री श्रावण अजित गावडे नावाच्या अवघ्या 10 वर्षांच्या मुलाचा हार्ट अटॅकने दुर्दैवी अंत झाला. खेळता-खेळता अस्वस्थ वाटू लागल्याने तो धावत घरी गेला आणि आईच्या मांडीवर अखेरचा श्वास घेतला. या घटनेने संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.
मन हेलावणारी घटना
कोडोलीतील आनंदनगर वसाहतीमध्ये राहणाऱ्या गावडे कुटुंबावर नियतीने मोठा आघात केला. रोजच्याप्रमाणेच श्रावण त्याच्या मित्रांसोबत गणेश मंडळाच्या शेडमध्ये आनंदाने खेळत होता. त्याला अचानक अस्वस्थ वाटू लागले. कोणताही विचार न करता तो थेट आपल्या घराकडे धावला आणि आईच्या कुशीत शिरला. आईच्या मांडीवर डोकं ठेवताच त्याला हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि त्याच क्षणी त्याने डोळे मिटले.
advertisement
चौथीत शिकणारा श्रावण एकुलता एक
घरातील आणि शेजारच्या लोकांच्या कानावर श्रावणच्या आईचा आक्रोश पडला. सर्वांनी धावपळ करून त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. श्रावण हा चौथीच्या वर्गात शिकत होता आणि गावडे कुटुंबाचा तो एकुलता एक मुलगा होता. चार वर्षांपूर्वीच या कुटुंबाने आपल्या मुलीला गमावले होते. या घटनेमुळे संपूर्ण गाव सुन्न झाले असून, सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
advertisement
हे ही वाचा : Manoj Jarange Patil: मुंबईतील CSMT चौकाला ‘मनोज जरांगे पाटील’ यांचे नाव द्यावे, कुणी केली मागणी?
हे ही वाचा : कराडकरांसाठी महत्त्वाची बातमी! गणेश विसर्जनासाठी वाहतुकीत मोठा बदल; 'हे' मार्ग राहणार बंद
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 05, 2025 11:21 AM IST
मराठी बातम्या/ बातम्या/बातम्या/
नियतीचा क्रूर खेळ! 10 वर्षांच्या मुलाचा 'हार्ट अटॅक'ने मृत्यू, आईच्या मांडीवर सोडला जीव