मी एलन मस्कच्या 13व्या मुलाची आई, तरुणीने व्हॅलेंटाईन डेला केला खळबळजनक दावा
- Published by:Jaykrishna Nair
Last Updated:
Elon Musk: एलन मस्क यांना 3 पार्टनरपासून एकूण 12 मुले आहेत. आता अॅशली सेंट क्लेअरने आपण मस्कच्या मुलाला 5 महिन्यांपूर्वी जन्म दिल्याचा दावा केला आहे.
न्यूयॉर्क: अमेरिकेतील प्रसिद्ध MAGA (Make America Great Again) समर्थक आणि वादग्रस्त वक्तव्यांसाठी ओळखली जाणारी अॅशली सेंट क्लेअर (३१) हिने एक धक्कादायक खुलासा करत सोशल मीडियावर खळबळ उडवली आहे. तिने दावा केला आहे की, तिला एलन मस्क यांच्यापासून मुलगा झाला आहे.
व्हॅलेंटाईन डेनिमित्त तिने हा खुलासा करत सांगितले की, पाच महिन्यांपूर्वी तिने एका गोंडस बाळाला जन्म दिला आणि त्या बाळाच्या पित्याचे नाव एलन मस्क आहे. "मी यापूर्वी हे जाहीर केले नव्हते, कारण मला माझ्या मुलाची प्रायव्हसी आणि सुरक्षेचा प्रश्न होता. मात्र, सध्या काही टॅब्लॉइड माध्यमे ही गोष्ट उघड करणार असल्याचे स्पष्ट झाले आहे," असे तिने एका पोस्टमध्ये नमूद केले.
advertisement
तिने पुढे माध्यमांना विनंती केली की, माझ्या मुलाला एक सामान्य आणि सुरक्षित वातावरण मिळावे, हीच माझी इच्छा आहे. त्यामुळे माध्यमांनी कृपया त्याच्या खासगी आयुष्याचा सन्मान करावा आणि अनावश्यक हस्तक्षेप करू नये.
Alea Iacta Est pic.twitter.com/gvVaFNTGqn
— Ashley St. Clair (@stclairashley) February 15, 2025
advertisement
दरम्यान, एलन मस्क यांनी या दाव्यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. मस्कच्या वकिलांशी संपर्क साधला जात आहे, अशी माहिती काही सूत्रांनी दिली आहे. एलोन मस्क यांना सध्या 12 मुले आहेत. मस्क यांना पहिली पत्नी जस्टिनपासून सहा मुलं, संगीतकार ग्राइम्सपासून तीन मुलं आणि न्यूरालिंकच्या माजी संचालक शिवॉन जिलिसपासूनही तीन मुलं आहेत.
advertisement
नुकताच मस्क यांनी व्हाइट हाउसमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती. या भेटीत मस्कची 3 मुले देखील होती. त्यांचा सर्वात लहान मुलगा पहिल्यांदा दिसला होता.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
February 15, 2025 3:34 PM IST
मराठी बातम्या/ बातम्या/बातम्या/आंतरराष्ट्रीय/
मी एलन मस्कच्या 13व्या मुलाची आई, तरुणीने व्हॅलेंटाईन डेला केला खळबळजनक दावा