२६/११चा मास्टरमाईंड मुंबईकरांचा शत्रू रहमान मक्की पाकिस्तानमध्ये मृत्यू, वर्षभरापूर्वी झाला होता गायब
- Published by:Jaykrishna Nair
Last Updated:
लाहोर: मुंबईवर झालेल्या २६/११चा हल्ल्यातील दहशतवादी मोस्ट वॉन्टेड गुन्हेगार, दहशतवादी आणि लष्कर-ए-तोयबाचा नायब अमीर अब्दुल रहमान मक्कीचा लाहोरमध्ये रहस्यमय पद्धतीने मृत्यू झाला आहे. मागील वर्षी पाकिस्तानमध्ये तो अचानक गायब झाला होता. 26/11 मुंबई हल्ला आणि लाल किल्ल्यावर हल्ल्यासह अनेक मोठ्या दहशतवादी घटनांमध्ये मक्की वॉन्टेड दहशतवादी होता.
अब्दुल रहमान मक्कीचा लाहोरमधील एका रुग्णालयात मृत्यू झाला. मक्की मागील वर्षी 2023 मध्ये पाकिस्तानमध्ये गायब झाल्यानंतर असे म्हटले गेले होते की, काहींनी त्याला पळवून नेले आहे. मात्र प्रत्यक्षात 2023 मध्ये संयुक्त राष्ट्राने त्याला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित केल्यानंतर पाकिस्तानने त्याला लपवून ठेवले होते. पाकिस्तानने मक्कीला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी लपवले. आता रुग्णालयात त्याचा मृत्यू झाला.
advertisement
डॉ.मनमोहन सिंग किती कोटींची संपत्ती मागे ठेवून गेले
अब्दुल रहमान मक्की हा कुख्यात दहशतवादी संघटना लष्कर-ए-तोयबाचा नायब अमीर होता.तो पाकिस्तानमधील दहशतवादी संघटनांच्या राजकीय गट जमात-उद-दावाचा सेकंड इन कमांडर देखील होता. तो भारताचा आणखी एका मोस्ट वॉन्टेड दहशतवादी हाफिज मोहम्मद सईदचा चुलत भाऊ आणि सख्खा मेव्हणा देखील होता.
अनेक दहशतवादी हल्ल्यांचा मास्टरमाईंड होता
2023 मध्ये संयुक्त राष्ट्राच्या समितीने सात दहशतवादी हल्ल्यांचा हवाला देऊन त्याला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित केले होते. त्यामध्ये 2000 सालचा लाल किल्ल्यावरील हल्ला, 2008 सालचा रामपूर हल्ला, 2008 मधील मुंबई 26/11 हल्ला आणि 2018 मधील गुरेज येथील हल्ल्याचा समावेश होता. विशेष बाब म्हणजे, 2022 च्या जून महिन्यात अमेरिका आणि भारताचा हा प्रस्ताव चीनने रोखला होता. मात्र 2023 साली चीनला यावरून माघार घ्यावी लागली होती.
advertisement
संयुक्त राष्ट्राच्या समितीने या निर्णयासोबत दिलेल्या निवेदनात म्हटले होते की, अब्दुल रहमान मक्कीसह लष्कर-ए-तोयबा आणि जमात-उद-दावा या गटाचे अतिरेकी भारतामध्ये विशेषतः जम्मू आणि काश्मीरमध्ये निधी पुरवतात आणि तरुणांना फसवून दहशतवादी बनवतात. तसेच हल्ल्यांच्या योजनेत त्यांना सहभागी करतात.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
December 27, 2024 2:39 PM IST
मराठी बातम्या/ बातम्या/बातम्या/आंतरराष्ट्रीय/
२६/११चा मास्टरमाईंड मुंबईकरांचा शत्रू रहमान मक्की पाकिस्तानमध्ये मृत्यू, वर्षभरापूर्वी झाला होता गायब


