advertisement

किडनॅपरला मिठी मारुन रडायला लागला चिमुकला, 14 महिन्यांपूर्वी झालं होतं अपहरण; नेमकं प्रकरण काय?

Last Updated:

राजस्थानमध्ये एक अनोखी घटना घडली आहे. एका अपहरणकर्त्याने एका मुलाचं अपहरण केलं होतं. जेव्हा आरोपीला अटक झाली, तेव्हा अपहरण झालेला लहान मुलगा अपहरणकर्त्याच्या गळ्यात पडून रडू लागला. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

किडनॅपरला मिठी मारुन रडायला लागला चिमुकला
किडनॅपरला मिठी मारुन रडायला लागला चिमुकला
नवी दिल्ली : राजस्थानमध्ये एक अनोखी घटना घडली आहे. एका अपहरणकर्त्याने एका मुलाचं अपहरण केलं होतं. जेव्हा आरोपीला अटक झाली, तेव्हा अपहरण झालेला लहान मुलगा अपहरणकर्त्याच्या गळ्यात पडून रडू लागला. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या अनोख्या क्षणी पोलीसदेखील भावूक झाले होते. हे प्रकरण नेमकं काय आहे, ते सविस्तर जाणून घेऊ या.
राजस्थानच्या राजधानीत एक अनोखी घटना घडली. या घटनेचा व्हिडिओ शेअर झाला आहे. यात अपहरणकर्त्याने 14 महिन्यांपूर्वी ज्या लहान मुलाचं अपहरण केलं होतं, तो मुलगा अपहरणकर्त्याला अटक होताच त्याच्या गळ्यात पडून रडू लागला. लहानगा रडताना पाहून आरोपी त्याच्या भावनांवर नियंत्रण ठेवू शकला नाही. तोही रडू लागला. या अनोख्या क्षणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
advertisement
14 महिन्यांपूर्वी जयपूरमधून एका मुलाचं अपहरण झालं होतं. 14 महिन्यांनंतर पोलिसांनी मुलासह आरोपीला ताब्यात घेतले. तनुज चाहर असं या आरोपीचं नाव आहे. जेव्हा मुलाला त्याच्या आई-वडिलांकडे सुपूर्द करण्याची वेळ आली तेव्हा तो अपहरणकर्त्या व्यक्तीला सोडण्यास तयार नव्हता. पोलिसांनी आरोपीजवळ असलेल्या मुलाला जबरदस्तीने त्याच्या कुटुंबीयांकडे सुपूर्द केलं. लहान मुलाला रडताना पाहून आरोपीदेखील रडू लागला.
advertisement
गेल्या वर्षी 14 जून रोजी जयपूरच्या सांगानेरमधल्या 11 महिन्यांच्या पृथ्वी उर्फ कुक्कूचं अपहरण झालं होतं. 14 महिन्यानंतर पोलिसांनी अपहरणकर्त्याला अटक करून, त्याच्याकडून मुलाला ताब्यात घेतलं. या दरम्यान मुलाला सुपूर्द करण्याची वेळ आली, तेव्हा तो जोरजोरात रडू लागला. हे दृश्य पाहून पोलीस कर्मचाऱ्यांचे डोळे पाणावले.
advertisement
सुमारे 14 महिने कुक्कूचं अपहरण झालं. तेव्हापासून तो आरोपीच्या कैदेत होता; पण त्याने मुलाला कोणत्याही प्रकारचा त्रास दिला नाही. तो मुलाची काळजी घेत होता. त्याला नवीन कपडे, खेळणी देत होता. तनुज चाहर हा उत्तर प्रदेश पोलीस दलात हेड कॉन्स्टेबल होता. तो सध्या निलंबित आहे.
मुलाचं अपहरण केल्यावर त्याने वेश बदलला होता. दाढी-मिशी वाढवून भगवं वस्त्र परिधान करून तो साधू बनून राहत होता; पण पोलिसांनी त्याचा शोध घेतला आणि जयपूर पोलिसांनी त्याला अलीगड इथे अटक केली. सध्या हा व्हिडिओ जोरदार चर्चेत आहे.
view comments
मराठी बातम्या/ बातम्या/बातम्या/
किडनॅपरला मिठी मारुन रडायला लागला चिमुकला, 14 महिन्यांपूर्वी झालं होतं अपहरण; नेमकं प्रकरण काय?
Next Article
advertisement
सूर्यास्तानंतर आकाशात काहीतरी मोठं घडणार, दुर्लक्ष करू नका; उघड्या डोळ्यांनी दिसणार गूढ अन् दुर्मीळ दृश्य
सूर्यास्तानंतर काहीतरी मोठं घडणार, दुर्लक्ष करू नका;दिसणार गूढ अन् दुर्मीळ दृश्य
  • 28 फेब्रुवारीची रात्र ठरणार 'कयामत'

  • दृश्य पाहून डोळ्यांवर विश्वास बसणार नाही

  • रहस्यमयी रांग आणि पृथ्वीवरचा परिणाम...

View All
advertisement