Police Constable Recruitment: मोठी संधी! मेगा पोलीस भरतीची जाहिरात आली; शिपाई संवर्गातील 17 हजार 471 पदे रिक्त

Last Updated:

Police Constable Recruitment: या भरतीची परीक्षा ओएमआर अथवा ऑनलाइन पद्धतीने होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. बुधवारी (ता. 31 जानेवारी) गृह विभागाकडून याबाबतचे आदेश निर्गमित करण्यात आले आहेत.

News18
News18
मुंबई, 02 फेब्रुवारी : राज्याच्या पोलीस विभागात शिपाई संवर्गातील 17 हजार 471 जागांच्या भरतीला मान्यता मिळाली आहे. या भरतीची परीक्षा ओएमआर अथवा ऑनलाइन पद्धतीने होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. बुधवारी (ता. 31 जानेवारी) गृह विभागाकडून याबाबतचे आदेश निर्गमित करण्यात आले आहेत.
पोलीस शिपाई संवर्गातील पोलीस शिपाई, बॅण्डस्मन, पोलीस शिपाई चालक, सशस्त्र पोलीस शिपाई व कारागृह शिपाई अशी एकूण 17 हजार 471 पदे भरण्यात येणार आहेत. वित्त विभागाने 30 सप्टेंबर 2022 रोजीच्या शासन निर्णयान्वये प्रशासकीय विभागांनी सुधारित आकृतीबंध अंतिम मंजूर केले आहेत अशा प्रशासकीय विभागांना सुधारित आकृतीबंधातील महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेतील पदे वगळता, अन्य संवर्गातील सरळसेवेच्या कोट्यातील रिक्त असलेली पदे 50 टक्के भरण्यास मान्यता देण्यात आली आहे.
advertisement
राज्यात कायदा व सुव्यवस्थेच्या अनुषंगाने पोलीस शिपाई संवर्गातील पदाची अत्यंत आवश्यकता असल्याने पोलीस शिपाई संवर्गातील 100 टक्के रिक्त पदे भरण्याकरिता वित्त विभागाच्या 30 सप्टेंबर 2022 रोजीच्या शासन निर्णयामधील तरतुदीमधून सूट देण्यात आली असल्याचेही सांगण्यात आले आहे.
advertisement
महत्त्वाची बाब म्हणजे, सामान्य प्रशासन विभागाच्या 4 मे 2022 आणि 21 नोव्हेंबर 2022 रोजीच्या शासन निर्णयातील तरतुदीमधून सूट देऊन पोलीस शिपाई संवर्गातील ही रिक्त पदे भरतीसाठी राबविण्यात येणारी परीक्षा ही ऑनलाइन पद्धतीने तसेच ओएमआर आधारित परीक्षा घेण्याला मान्यता देण्यात आली आहे. या परीक्षेची जबाबदारी पोलीस अधीक्षक, पोलीस आयुक्त, समादेशक व अन्य पोलीस प्राधिकारी यांच्याकडे असणार आहे. तसेच, पोलीस शिपाई भरती प्रक्रियाअंतर्गत अर्ज सादर करणाऱ्या उमेदवारांच्या एकत्रित अर्ज स्विकृती, छाननी व तत्सम कामाकरिता बाह्य सेवापुरवठादार कंपनीची निवड करण्याचे अधिकार अपर पोलीस महासंचालक, प्रशिक्षण व खास पथके, मुंबई यांना देण्यात आली आहे.
view comments
मराठी बातम्या/ बातम्या/बातम्या/राज्य/
Police Constable Recruitment: मोठी संधी! मेगा पोलीस भरतीची जाहिरात आली; शिपाई संवर्गातील 17 हजार 471 पदे रिक्त
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement