Virat Kohli : ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर निवृत्ती की 2027 चा वर्ल्ड कप? किंग कोहलीने एका वाक्यात विषय संपवला!
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
Virat Kohli Cryptic Post : विराट आता 2027 चा वर्ल्ड कप खेळणार असल्याचे संकेत दिलेत, असं काहीजण म्हणत आहेत. त्याचबरोबर विराटच्या वयावर प्रश्न उपस्थित करणाऱ्यांना किंगने उत्तर दिलंय.
Virat Kohli Cryptic Post : ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी (Australia ODI series) टीम इंडिया दिल्ली विमानतळावरून रवाना झाली आहे. तब्बल सात महिन्यानंतर विराट कोहली आणि रोहित शर्मा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खेळताना दिसतील. टी-ट्वेंटी आणि कसोटीमधून निवृत्ती घेतल्यानंतर आता दोन्ही खेळाडू फक्त वनडे क्रिकेट खेळतात. अशातच आता ऑस्ट्रेलिया दौऱ्याआधी विराट कोहलीने (Virat Kohli X Post) एक पोस्ट केली आहे. त्यावरून त्याने टीकाकारांना उत्तर दिलं आहे.
हार मानण्याचा निर्णय घेता तेव्हाच...
विराट कोहलीने ट्विटरवर एक इंग्लिशमध्ये लाईन लिहिली आहे. The only time you truly fail, is when you decide to give up, असं विराट कोहलीने पोस्ट करत म्हटलं आहे. 'जेव्हा तुम्ही हार मानण्याचा निर्णय घेता तेव्हाच तुम्ही खरोखर अपयशी ठरता', असा या पोस्टचा अर्थ होतो. विराट कोहलीने पोस्ट केलेल्या या एका ओळीचे अनेक अर्थ काढले जात आहेत.
advertisement
विराटचं गंभीरला उत्तर
विराट कोहलीने यावेळी सिलेक्टर्सला उत्तर दिलं आहे का? असा सवाल विचारला जाऊ लागला आहे. तसेच विराट आता 2027 चा वर्ल्ड कप खेळणार असल्याचे संकेत दिलेत, असं काहीजण म्हणत आहेत. त्याचबरोबर विराटच्या वयावर प्रश्न उपस्थित करणाऱ्यांना किंगने उत्तर दिलंय, असं देखील म्हटलं जात आहे. तसेच विराटने गंभीरला चोख प्रत्युत्तर दिलंय, असं देखील म्हटलं जातंय.
advertisement
The only time you truly fail, is when you decide to give up.
— Virat Kohli (@imVkohli) October 16, 2025
विराट कोहलीची वनडे कारकीर्द
दरम्यान, कोहलीने 2008 मध्ये वनडे क्रिकेटमध्ये डेब्यू केला आणि तेव्हापासून त्याने या फॉर्मेटवर वर्चस्व गाजवले आहे. त्याने आतापर्यंत खेळलेल्या अंदाजे 302 मॅचमध्ये 57.88 च्या उत्कृष्ट सरासरीने 14,181 धावा केल्या आहेत. या प्रवासात कोहलीने 51 शतके आणि 74 अर्धशतके झळकावली आहेत, ज्यात सचिन तेंडुलकरचा 49 शतकांचा विश्वविक्रम मोडून सर्वाधिक शतके करण्याचा विक्रम त्याने आपल्या नावावर केला आहे. कोहली हा 8,000 ते 14,000 पर्यंतचे प्रत्येक हजार धावांचे टप्पे सर्वात जलद पूर्ण करणारा एकमेव प्लेअर आहे. विशेषतः चेस मास्टर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोहलीने टीम इंडियाला अनेक ऐतिहासिक मॅच जिंकवून दिल्या आहेत, आणि वर्ल्ड कप 2023 मध्ये त्याने टूर्नामेंटमध्ये सर्वाधिक 765 धावा करण्याचा विक्रम केला होता.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 16, 2025 11:23 AM IST
मराठी बातम्या/ बातम्या/बातम्या/
Virat Kohli : ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर निवृत्ती की 2027 चा वर्ल्ड कप? किंग कोहलीने एका वाक्यात विषय संपवला!