आता जुने ट्रॅक्टर विकून टाका, मार्केटमध्ये 5 लाखांपेक्षा कमी किंमतीत आलेत सुपर पॉवर ट्रॅक्टर, खासियत काय?

Last Updated:
Tractor News : शेतकऱ्यांसाठी सध्या बाजारात प्रत्येक बजेट आणि गरजेनुसार ट्रॅक्टर उपलब्ध आहेत. ट्रॅक्टर पूर्वीपेक्षा अधिक प्रगत झाले आहेत. त्यामुळे आता शेती करणे आणखी खूप सोपे झाले आहे आणि बराच वेळ वाचतो.
1/5
tractor news
शेतकऱ्यांसाठी सध्या बाजारात प्रत्येक बजेट आणि गरजेनुसार ट्रॅक्टर उपलब्ध आहेत. ट्रॅक्टर पूर्वीपेक्षा अधिक प्रगत झाले आहेत. त्यामुळे आता शेती करणे आणखी खूप सोपे झाले आहे आणि बराच वेळ वाचतो. जर तुम्ही परवडणाऱ्या ट्रॅक्टरचा विचार करत असाल आणि अद्याप चांगला पर्याय सापडला नसेल, तर आम्ही तुम्हाला 5 लाखांपेक्षा कमी किंमतीच्या नवीन ट्रॅक्टरबद्दल माहिती देत ​​आहोत.
advertisement
2/5
tractor news
Swaraj 724 XM ट्रॅक्टर केवळ लोकप्रिय नाही तर तो एक शक्तिशाली आणि विश्वासार्ह इंजिनसह येतो. तो शेती सुलभ करण्यास मदत करतो. हा स्वराज ट्रॅक्टर 2-सिलेंडर, 1824 सीसी इंजिनने सुसज्ज आहे. जो 25 एचपी आणि 1800 आरपीएम निर्माण करतो. खासियत बद्दल बोलायचे झाले तर, ट्रॅक्टरचा फॉरवर्ड स्पीड 2.1 किमी प्रतितास ते 27.78 किमी प्रतितास पर्यंत आहे, तर रिव्हर्स स्पीड 2.74 किमी प्रतितास ते 10.77 किमी प्रतितास पर्यंत आहे. हा 2 डब्ल्यूडी ट्रॅक्टर 8 फॉरवर्ड आणि 2 रिव्हर्स गीअर्ससह येतो.
advertisement
3/5
tractor
हे 1000 किलो वजन उचलण्याची क्षमतासह येते.या ट्रॅक्टरचे खास वैशिष्ट्य म्हणजे त्याचा कमी इंधन वापर, ज्यामुळे नांगरणी, वाहतूक आणि पेरणी यासारखी सर्व शेतीची कामे करणे सोपे होते. स्वराज 724 एक्सएम ट्रॅक्टरची किंमत 4.88 लाख पासून सुरू होते.
advertisement
4/5
KUBOTA NEO STAR A211N 4WD
KUBOTA NEO STAR A211N 4WD -   कुबोटाचा निओस्टार A211N 4WD हा ट्रॅक्टर वजनाने हलका पण आणि शक्तिशाली आtractor newsहे. या ट्रॅक्टरमध्ये 3-सिलेंडर, 1001cc इंजिन आहे आणि 2600 rpm वर 21 hp जनरेट करतो. लिक्विड-कूल्ड कूलिंग सिस्टममुळे हा ट्रॅक्टर जास्त गरम होत नाही. हा कुबोटा ट्रॅक्टर 12-स्पीड गिअरबॉक्ससह येतो, ज्यामध्ये 9 फॉरवर्ड आणि 3 रिव्हर्स गीअर्स आहेत. हा ट्रॅक्टर शेती करणे सोपे करतो. तो 5 वर्षांच्या वॉरंटीसह येतो. तर कुबोटा निओस्टार A211N 4WD ची भारतात किंमत 4.66 लाख रु पासून सुरू होते.
advertisement
5/5
tractor news
Mahindra OJA 2121 4WD -  ट्रॅक्टर हा लहान शेतकऱ्यांसाठी एक चांगला पर्याय आहे. 21 HP PTO पॉवर आणि 63.5 Nm टॉर्कसह, हा शक्तिशाली ट्रॅक्टर लहान शेतीसाठी आदर्श आहे. तो 2400 आरपीएम जनरेट करतो. यात फोर-व्हील ड्राइव्ह, पॉवर स्टीअरिंग आणि 12 फॉरवर्ड आणि 12 रिव्हर्स गिअर्स आहेत. ट्रॅक्टरची पॉवर लिफ्टींग क्षमता 950 किलो इतकी आहे. त्याचा ग्राउंड क्लिअरन्स 303 मिमी आहे आणि तो एक कॉम्पॅक्ट ट्रॅक्टर आहे. भारतात त्याची किंमत 4.97 लाख पासून सुरू होते.
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement