Aajache Rashibhavishya: जुनी चूक त्रासदायक ठरणार, मित्रांमुळे फायदा होणार, मेष ते मीन आजचं राशीभविष्य
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Kunal Santosh Dandgaval
Last Updated:
Horoscope Today: सोमवार, 7 जुलै हा दिवस काही राशींसाठी खास तर, काहीसांठी नवी आव्हाने घेऊन येणा आहे. तुमचं आजचं राशीभविष्य जाणून घेऊ.
मेष राशी - तुमच्या अवतीभवतीचे लोक खूप कामाची अपेक्षा तुमच्याकडून करतील परंतु जेवढे काम तुम्ही करू शकता तेवढ्याचेच वचन द्या. राहिलेली देणी परत मिळवाल. गरजवंतांना मदत करण्याच्या तुमच्या क्षमतेमुळे तुम्हाला आदर मिळेल. कामाच्या ठिकाणी आज लाभ मिळण्याची शक्यता आहे. वरिष्ठांकडून आज कौतुक होणार. आज तुमचा शुभ अंक 5 आणि रंग हिरवा असणार आहे.
advertisement
वृषभ राशी - आर्थिक रूपात आज तुम्ही बरेच मजबूत असाल ग्रहनक्षत्रांच्या चालीने आज तुमच्यासाठी धन कमावण्यासाठी बऱ्याच संधी मिळतील. निष्काळजीपणा महागात पडू शकतो. मुलांमुळे आजची संध्याकाळ प्रसन्न राहील. कौटुंबिक जबाबदाऱ्या बंधनांकडे त्वरित लक्ष देणे गरजेचे आहे. आज तुमचा शुभ अंक 4 आणि रंग करडा असणार आहे.
advertisement
मिथुन राशी - तुमच्या इच्छा प्रत्यक्षात येण्यासाठी तुमचे विचार आणि ऊर्जा वापरा. आज तुम्हाला आपल्या भाऊ-बहिणीच्या मदतीने धन लाभ होण्याची शक्यता आहे. आजच्या दिवसाचे खूप काळजीपूर्वक नियोजन करा. गोष्टी शिकण्याकडे तुमचा कल असून तो उल्लेखनीय ठरेल. तुमच्या वैवाहिक आयुष्यातील आजचा सर्वोत्तम दिवस असेल. आज तुमचा शुभ अंक 2 आणि रंग पांढरा असणार आहे.
advertisement
कर्क राशी - आज जवळच्या मित्राच्या मदतीने काही लोकांना आज चांगले धनलाभ होण्याची शक्यता आहे. हे धन तुमच्या बऱ्याच समस्यांना दूर करू शकते. आता तुमच्या महत्त्वाकांक्षा ओळखण्याची वेळ आहे आणि त्यानुसार मेहनत करायला हवी. यश तुमची आतुरतेने वाट पाहात आहे. राहिलेली कामे आज पूर्ण होतील आणि नवीन कामे हाती घेतले तर ती कामे योग्य रीतीने मार्गी लागतील. आज तुमचा शुभ अंक 5 आणि रंग हिरवा असणार आहे.
advertisement
सिंह राशी - मानसिक शांततेसाठी तुमचा तणाव दूर करा. आज तुमच्यासाठी खूपच कार्यशील असा दिवस आहे. अलीकडच्या काही दिवसांत तुमचे आयुष्य खडतर होते, पण आता तुमच्या जोडीदारासमवेत तुम्हाला स्वर्गीय सुख मिळणार आहे. हातातील कामे पूर्ण करण्यास काहीसा अडथळा निर्माण होऊ शकतो. त्यामुळे सावधगिरी बाळगा. आज तुमचा शुभ अंक 4 आणि रंग करडा असणार आहे.
advertisement
कन्या राशी - प्रदीर्घ काळापासून तुम्ही अनुभवत असलेले आयुष्यातील तणाव आणि ओढाताण यापासून थोडे मुक्त व्हाल. सगळे ताणतणाव दूर ठेवण्यासाठी तुम्ही तुमची जीवनशैली बदलायला हवी आणि हीच त्यासाठी योग्य वेळ आहे. आर्थिक परिस्थिती थोडी बेताची होऊ शकते. प्रलंबित प्रकल्प आणि योजनांना अंतिम स्वरूप मिळेल. आज तुमचा शुभ अंक 2 आणि रंग पांढरा असणार आहे.
advertisement
तूळ राशी - तुमच्याकडे प्रचंड प्रमाणात ऊर्जा आहे - परंतु कामाच्या ताणामुळे तुम्ही त्रासून जाल. आपल्या अपेक्षेप्रमाणे पैसे मिळणार नाहीत. प्रिय व्यक्तीसोबत वादावादी होऊ नये यासाठी वादग्रस्त विषय टाळा. व्यावसायिक भागीदार चांगला आधार देतील आणि तुम्ही दोघे मिळून प्रलंबित कामे पूर्ण कराल. एखादी अनोळखी व्यक्ती तुमच्यात आणि तुमच्या जोडीदारामध्ये वाद निर्माण करू शकेल. आज तुमचा शुभ अंक 5 आणि रंग हिरवा असणार आहे.
advertisement
वृश्चिक राशी - संयम बाळगा, आपले निरंतर प्रयत्न आणि समजून घेण्यामुळे आपणास हमखास यशप्राप्ती होणार आहे. ज्या लोकांनी अतीतमध्ये आपली धन गुंतवणूक केली होती आज त्या धनाने लाभ होण्याची शक्यता आहे. आज नवीन गोष्टीत गुंतवणूक करणे फायद्याचे ठरणार आहे. कामे मार्गी लागतील. आज तुमचा शुभ अंक 6 आणि रंग गुलाबी असणार आहे.
advertisement
धनु राशी - तुम्ही मागील काळात खूप पैसा खर्च केला आहे ज्याचा परिणाम तुम्हाला आज भोगावा लागू शकतो. आज तुम्हाला पैशाची आवश्यकता असेल परंतु तुम्हाला ते मिळणार नाही. आपल्या कामाबाबत आणि दृष्टिकोनाबाबत प्रामाणिक राहा. कौटुंबिक जबाबदारी अंगावर पडणार आहे. नवीन लग्न झालेल्या मंडळींना आज आनंदाची बातमी मिळू शकते. आज तुमचा शुभ अंक ३ आणि रंग पिवळा असणार आहे.
advertisement
मकर राशी - आपल्यासाठी काय चांगले आहे हे फक्त तुम्हाला स्वतःलाच माहीत आहे. त्यामुळे ठामपणाने, धाडसी आणि जलद निर्णय घेऊन परिणामांना सामोरे जाण्याची तयारी ठेवा. आर्थिक स्थितीतील बदल हे नक्कीच होणार आहेत. आज तुम्ही केलेल्या कामाचे श्रेय दुसरेच कुणीतरी घेण्याची शक्यता आहे. वरच्या पदावरील व्यक्तींपुढे ढोपर घासावे लागेल. आज तुमचा शुभ अंक 3 आणि रंग पिवळा असणार आहे.
advertisement
कुंभ राशी - तुमच्या मनावर ग्रासलेला विषाद काढून टाका - त्यामुळे तुमच्या प्रगतीत अडसर निर्माण झाला आहे. आज घरातून बाहेर जाताना मोठ्यांचा आशीर्वाद घेऊन निघा. यामुळे तुम्हाला धनलाभ होऊ शकतो. अनेक दिवस प्रलंबित असणाऱ्या निर्णयांना अंतिम स्वरूप मिळेल आणि नवे संयुक्तिक प्रकल्प मार्गी लागतील. दिवसाची सुरुवात जरी थोडी थकणारी राहील, परंतु जसे जसे दिवस पुढे जातील तुम्हाला चांगले फळ मिळायला लागतील. तुमचा शुभ अंक 1 आणि रंग नारंगी असणार आहे.
advertisement
मीन राशी - आजच्या दिवशी तुम्ही आराम करू शकाल. या राशीतील मुले खेळण्यात दिवस घालवू शकतात अशात माता-पित्याला त्यांच्यावर लक्ष दिले पाहिजे, कारण दुखापत होण्याची शक्यता आहे. तुम्ही केलेल्या चांगल्या कामाबद्दल आज कामाच्या ठिकाणी तुमचा सन्मान केला जाईल. समाजात आज तुमचा गौरव करण्यात येईल असे काम तुमच्या हातून होईल. आज तुमचा शुभ अंक 8 आणि रंग काळा असणार आहे.
advertisement