Astrology: टेन्शनमधून बाहेर! 9 ऑक्टोबरपासून तीन राशींना लक साथ देणार; कोणावर शुक्राची किमया?
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Shukra Astrology: ज्योतिषशास्त्रानुसार येत्या 9 ऑक्टोबर रोजी शुक्र बुधाच्या कन्या राशीत संक्रमण करणार आहे. शुक्र कन्या राशीत त्याच्या क्षीण-निम्न अवस्थेत असेल. दरम्यान, सूर्यही सध्या कन्या राशीत संक्रमण करत आहे. ज्योतिषीय दृष्टीकोनातून या संयोगामुळे अनेक राशींवर परिणाम होणारा योग निर्माण होत आहे.
advertisement
advertisement
कन्या - नीचभंग योग कन्या राशीच्या लोकांना विशेष फायदे देऊ शकतो. कामाच्या ठिकाणी अनेक बाबतीत लाभ मिळेल. नोकरी करणाऱ्यांना त्यांच्या करिअरमध्ये नवीन उंची गाठण्याची संधी मिळेल. आर्थिक लाभ आणि प्रेम संबंधांमध्ये सुधारणा होण्याची शक्यता आहे. बेरोजगार व्यक्तींना नोकरी मिळण्यात आता यश मिळेल. व्यवसायात नफा मिळण्यासह पगारात वाढ देखील शक्य आहे.
advertisement
तूळ - नीचभंग राजयोग तूळ राशीच्या लोकांना विशेष फायदे देऊ शकतो. व्यवसायात घेतलेल्या जुन्या निर्णयांमुळे लक्षणीय नफा मिळू शकतो. वैवाहिक जीवनात सुरू असलेले तणाव आणि संघर्ष संपतील. अविवाहितांसाठी आता विवाहाचे योग जुळून येतील. पदोन्नती किंवा नवीन नोकरीची शक्यता आहे. कौटुंबिक आदर वाढेल. नवीन स्रोतांमधून मिळणारे उत्पन्न आर्थिक अडचणी कमी करेल.
advertisement
वृश्चिक - नीचभंग योग वृश्चिक राशीच्या लोकांसाठी शुभ ठरेल. त्यांची सामाजिक प्रतिष्ठा वाढेल. प्रलंबित कामे पूर्ण होतील. भौतिक सुखसोयी वाढतील, ते त्यांचे ध्येय साध्य करू शकतील. करिअर आणि व्यवसायात नवीन संधी प्रगतीच्या मार्गावर नेतील. वाढत्या संपत्ती आणि समृद्धीसह, प्रेम जीवनात स्थिरता येऊ शकते. मित्र आणि नातेवाईकांकडून पाठिंबा मिळेल.(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)