Mahesh Bhatt: 'त्याची पँट काढा...' महेश भट्टला दाढीवाल्या मुलांनी घेरलं, केलेलं घृणास्पद कृत्य

Last Updated:

Mahesh Bhatt:बॉलिवूडचे ज्येष्ठ दिग्दर्शक महेश भट्ट हे नेहमीच त्यांच्या स्पष्ट बोलण्यामुळे चर्चेत राहतात.

महेश भट्ट
महेश भट्ट
मुंबई : बॉलिवूडचे ज्येष्ठ दिग्दर्शक महेश भट्ट हे नेहमीच त्यांच्या स्पष्ट बोलण्यामुळे चर्चेत राहतात. अलीकडेच ते त्यांची मुलगी पूजा भट्टचा शो “द पूजा भट्ट शो” मध्ये दिसले आणि त्यांनी तिथे त्यांच्या आयुष्यातील एक अतिशय वेदनादायक आठवण शेअर केली. ही अशी घटना होती, ज्याने त्यांचे बालपण आणि नंतरचं आयुष्य दोन्ही कायमचं बदलून टाकलं.
महेश भट्ट म्हणाले की, लहान असताना चार मोठ्या मुलांनी त्यांना रस्त्यावर थांबवलं आणि भिंतीवर ढकललं. “मी देवाला विनंती केली की मला वाचव, पण देव गप्प राहिला,” त्या मुलांनी त्यांच्यावर अत्यंत अपमानास्पद वक्तव्य केले. त्यांनी विचारलं, “तुझी आई तुझ्या वडिलांची प्रेयसी नाही का? मग तुझं नाव महेश का आहे?”
advertisement
महेश भट्ट म्हणाले की त्यांनी त्या मुलांना जाऊ देण्याची विनंती केली, परंतु ते त्यांचा छळ करत राहिले. त्यांनी सांगितले की एका मुलाने "त्याची पँट काढा!" असे म्हटले... त्या क्षणी त्यांना असहाय्य आणि अपमानित वाटले. त्यांनी सांगितले, "मी ओरडलो, 'तुम्ही माझ्याशी असे का करत आहात?'"
या प्रश्नांनी छोट्या महेशच्या मनावर खोल जखम केली. घाबरलेल्या महेशने त्या वेळी सांगितलं, “माझे वडील आमच्यासोबत राहत नाहीत, ते दुसऱ्या घरात राहतात.” हे ऐकून त्या मुलांनी त्यांना सोडून दिलं. पण त्या दिवसानंतर महेश भट्ट कधीच पूर्वीसारखे राहिले नाहीत. "त्या घटनेनंतर माझं माझ्या आईशी नातं बदललं. तिने मला भावनिकदृष्ट्या दूर केलं. या वेदनेने त्यांच्या मनात आयुष्यभरासाठी एक जखम सोडली. कदाचित त्यामुळेच त्यांच्या चित्रपटांमध्ये ‘अर्थ’, ‘जख्म’, ‘डॅडी’ सारख्या कथांमध्ये वेदना, सत्य आणि ओळख यांचे भाव दिसतात.
advertisement
यावेळी त्यांनी अभिनेत्री सोनी राजदानसोबतच्या प्रेमकथेचाही उल्लेख केला. किरण भट्टसोबत लग्न असतानाच ते सोनीच्या प्रेमात पडले. नंतर दोघांनी लग्न केलं आणि त्यांना आलिया भट्ट आणि शाहीन भट्ट या दोन मुली आहेत.
मराठी बातम्या/मनोरंजन/
Mahesh Bhatt: 'त्याची पँट काढा...' महेश भट्टला दाढीवाल्या मुलांनी घेरलं, केलेलं घृणास्पद कृत्य
Next Article
advertisement
एकही सिनेमा केला नाही, तरीही बी टाऊनमध्ये सर्वात श्रीमंत; संपत्तीत शाहरुखलाही सोडलं मागे
एकही सिनेमा केला नाही, तरीही बी टाऊनमध्ये सर्वात श्रीमंत; शाहरुखलाही सोडलं मागे
    View All
    advertisement