Dream Astrology: भयानक वाटणारी ही स्वप्ने खरंतर शुभ संकेत! चांगली वेळ सुरू होण्यापूर्वी होतं असं
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Dream Astrology: स्वप्नांची दुनिया खरंच निराळी आहे, चांगलं स्वप्न पडतं तेव्हा आपल्याला जागं व्हायचं नसताना जाग येते आणि खराब स्वप्न पडलेलं असताना जाग आल्यावर बरं वाटतं. स्वप्नात आपल्याला काय दिसेल याचा काहीज अंदाज लावता येत नाही. स्वप्नांच्या शास्त्रानुसार, प्रत्येक स्वप्न काहीतरी अर्थ सांगत असतं. काही स्वप्ने शुभ तर काही अशुभ संकेत देतात. प्राचीन हिंदू ग्रंथांमध्ये काही स्वप्नांना अत्यंत शुभ मानलं गेलं आहे. काही स्वप्ने इतरांसोबत शेअर करू नयेत. आज आपण अशा शुभ स्वप्नांविषयी जाणून घेणार आहोत.
मृत्यूचे दर्शन -एखाद्या व्यक्तीला स्वतःच्या किंवा त्यांच्या ओळखीच्या एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूचे स्वप्न पडले तर घाबरून जाण्याची गरज नाही. हे स्वप्न बहुतेकदा प्रत्यक्ष मृत्यू दर्शवत नाही, तर ते जीवनातील एका टप्प्याच्या नवीन सुरुवातीचे किंवा समाप्तीचे संकेत असते. कधीकधी, असे स्वप्न जुन्या दुःखांचा किंवा नकारात्मक भावनांचा शेवट दर्शवते.
advertisement
advertisement
फुलांची बाग -स्वप्नांच्या शास्त्रानुसार, स्वप्नात सुंदर निसर्ग, हिरवीगार झाडे किंवा फुलांनी भरलेली बाग पाहणं शुभ संकेत मानला जातो. याचा अर्थ तुम्हाला लवकरच काही चांगली बातमी, नवीन सुरुवात किंवा इच्छा पूर्ण होईल. अशी स्वप्ने सकारात्मक ऊर्जा आणतात असे मानले जाते. पण, हे स्वप्न इतरांसोबत शेअर करू नये, त्यांचा शुभ प्रभाव कमी होऊ शकतो.
advertisement
advertisement
देवाचे दर्शन -स्वप्नशास्त्रानुसार, स्वप्नात देवाचे दर्शन होणे अत्यंत शुभ आणि आध्यात्मिकदृष्ट्या पवित्र मानले जाते. असे स्वप्न तुमच्या आयुष्यातून दुःख, त्रास आणि अडचणी दूर होणार असल्याचे दर्शवते. काही दैवी शक्ती तुमच्यावर कृपा करत आहे आणि तुमच्या जीवनात सकारात्मक वळण येणार आहे, असा त्याचा अर्थ होतो.(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)


