आता पेट्रोल बाइकचे दिवस संपले, बजाजची CNG बाइक तयार, पण किती देणार मायलेज?
- Published by:Mohini Vaishnav
- trending desk
Last Updated:
बजाज ही देशातली लोकप्रिय दुचाकी उत्पादक कंपनी जगातली पहिली सीएनजी बाइक बाजारात लाँच करण्याच्या तयारीत आहे.
advertisement
advertisement
बजाज ही देशातली लोकप्रिय दुचाकी उत्पादक कंपनी जगातली पहिली सीएनजी बाइक बाजारात लाँच करण्याच्या तयारीत आहे. कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक राजीव बजाज यांनी नुकतीच यासंदर्भात घोषणा केली आहे. 'या वर्षी जून महिन्यात बजाज पहिली सीएनजी बाइक लाँच करत आहे,' असं त्यांनी सांगितलं. बजाजने या बाइकसाठी वेगळ्या नावाची निवड केली आहे. बजाज आगामी काळात आपल्या सीएनजी मॉडेल्ससाठी कंपनीचा सब-ब्रँड लाँच करू शकते.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
सीएनजी मोटरसायकल बजाजच्या खास प्रकल्पांपैकी एक आहे. ही कंपनी यापूर्वी सीएनजीवरच्या तिचाकी गाड्यांच्या उत्पादनासाठी ओळखली जात असे; पण टू-व्हीलरमध्ये सीएनजी तंत्रज्ञानाचा वापर करणारी बजाज ही पहिली कंपनी आहे. जूनमध्ये सीएनजी बाइक लाँच होईल. त्यानंतर ही जगातली पहिली सीएनजी बाइक ठरेल. पण या बाईकच्या मायलेजविषयी अद्याप कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.