Ola चा झाला गेम, ही स्कुटर ठरली नंबर 1; किंमत आणि फिचर्स कारपेक्षा कमी नाही!
- Published by:sachin Salve
Last Updated:
मार्केटमध्ये अनेक दमदार अशा इलेक्ट्रिक स्कुटर लाँच झाल्या आहेत. त्यामुळे चांगलीच स्पर्धा वाढली आहे. पण, या स्पर्धेत एप्रिल महिन्यात TVS मोटर्सने बाजी मारली आहे.
वाढत्या इंधनाच्या दरामुळे सध्या इलेक्ट्रिक वाहन खरेदी करण्याकडे लोकांचा कल वाढला आहे. त्यामुळे आता मार्केटमध्ये अनेक दमदार अशा इलेक्ट्रिक स्कुटर लाँच झाल्या आहेत. त्यामुळे चांगलीच स्पर्धा वाढली आहे. पण, या स्पर्धेत एप्रिल महिन्यात TVS मोटर्सने बाजी मारली आहे. TVS ची iqube ही एप्रिल महिन्यात बेस्ट सेलिंग स्कुटर ठरली आहे.
advertisement
एप्रिलमध्ये TVS कंपनीने पहिल्यांदाच धडाकेबाज कामगिरी केली आहे. गेल्या महिन्यात ९१,७९१ युनिट्सची जबरदस्त विक्री झाली. जी वार्षिक (YoY) ४०% जास्त आहे. एप्रिल २०२५ च्या आकडेवारीने एप्रिल २०२३ मधील ६६,८७८ युनिट्सचा मागील विक्रम मोडला. हे सर्व विक्रीचे आकडे वाहन डेटाबेसवर आधारित आहेत. एप्रिल २०२५ मध्ये टीव्हीएसच्या विक्रमी विक्रीत टीव्हीएस मोटरने अव्वल स्थान पटकावले आहे.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
TVS iQube ची विक्री iQube, iQube S आणि iQube ST या तीन वेगवेगळ्या व्हेरिएंटमध्ये केली जात आहे. त्याच्या टॉप मॉडेलमध्ये, कंपनीने 3.4 kWh क्षमतेचा न काढता येण्याजोगा बॅटरी पॅक दिलाय. कंपनीच्या दाव्यानुसार, पूर्ण चार्ज केल्यावर ते 145 किलोमीटरची रेंज देते. माहितीनुसार, हा बॅटरी पॅक बदलण्याची किंमत 56,000 ते 70,000 रुपये आहे. कंपनी बॅटरीवर 3 वर्षे किंवा 50,000 किलोमीटरची वॉरंटी देते. यानंतर जर बॅटरी खराब झाली तर त्याचा संपूर्ण खर्च तुम्हाला सहन करावा लागेल.
advertisement
advertisement