IND vs PAK :हरमनप्रीतने आधी जागा दाखवली, मग सूर्याने पाकिस्तानची उरली सुरली इज्जत काढली, मैदानात राडा
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
भारतीय कर्णधार हरमनप्रीत कौरने पाकिस्तानच्या फातिमा सनासोबत हॅडशेक टाळत पाकिस्तानला त्यांची जागा दाखवली आहे.त्यानंतर भारताचा टी20 कर्णधार सूर्यकुमार यादवने पाकिस्तानची उरली सूरली इज्जत काढली आहे.
India w vs Pakistan w : आयसीसीच्या वुमेन्स वर्ल्डकप स्पर्धेत आज भारतीय महिलांचा संघ आणि पाकिस्तानी महिलांचा संघ आमने सामने आला आहे. या सामन्याला सूरूवात झाली आहे.आणि या सामन्यात भारतीय कर्णधार हरमनप्रीत कौरने पाकिस्तानच्या फातिमा सनासोबत हॅडशेक टाळत पाकिस्तानला त्यांची जागा दाखवली आहे.त्यानंतर भारताचा टी20 कर्णधार सूर्यकुमार यादवने पाकिस्तानची उरली सूरली इज्जत काढली आहे.त्यामुळे सूर्या नेमकं काय म्हणाला आहे? हे जाणून घेऊयात.
भारत आणि पाकिस्तान सामन्याआधी सूर्यकुमार यादव एका शोवर म्हणाला की, मी पुन्हा एकदा सांगेन की स्पर्धा म्हणजे जेव्हा सामना एकमेकांशी असतो. 11-0 ही स्पर्धा नसते. जर आपल्या महिला संघाने चांगले क्रिकेट खेळण्यावर लक्ष केंद्रित केले तर ते 12-0 असेल, असा सल्ला दिला आहे. त्यामुळे सूर्याने पुन्हा एकदा पाकिस्तानची अब्रु काढली आहे.
advertisement
भारताच्या महिलांनी पाकिस्तानविरुद्ध कधीही एकदिवसीय सामना गमावलेला नाही, त्यांनी हेड-टू-हेड 11-0 असा आघाडी घेतला आहे. प्रथम फलंदाजी करणाऱ्या सामन्यांमध्ये, त्यांचा सरासरी विजयी फरक 138 धावांचा आहे, तर पाठलाग करणाऱ्या सामन्यांमध्ये, त्यांनी सरासरी आठ विकेट्सने आणि 26 षटके शिल्लक असताना विजय मिळवला आहे. महिला विश्वचषक स्पर्धेत भारताचा विक्रम 4-0 असा आहे.
advertisement
दरम्यान भारताने आशिया कपमध्ये पाकिस्तानचा तीनदा पराभव केला होता. फायनल सामन्यात हेच कट्टर प्रतिस्पर्धी सामने आले होते.त्यामुळे भारताने 6 विकेटस राखून पाकिस्तानवर विजय मिळवला होता. या स्पर्धेनंतर सूर्यकुमार यादवने थेट पाकिस्तानला उद्देशून म्हटले की “प्रतिस्पर्धा” हा शब्द आता लागू होत नाही. त्यामुळे “तुम्ही लोकांनी भारत-पाकिस्तानमधील प्रतिस्पर्ध्याबद्दल प्रश्न विचारणे थांबवावे. माझ्या मते, जर दोन संघ 15-20 सामने खेळले आणि जर ते बरोबरीत आले तर ते प्रतिस्पर्धी आहे. 10-0, 10-1 मला आकडेवारी माहित नाही, परंतु ही आता प्रतिस्पर्धी नाही. तसेच मला वाटते की आम्ही त्यांच्या (पाकिस्तान) पेक्षा चांगले क्रिकेट खेळलो, आणि गोलंदाजीच्या दृष्टिकोनातूनही,” असे त्यांनी आशिया कप विजयानंतर पत्रकारांना सांगितले होते.
advertisement
नो हॅन्डशेक
टॉस दरम्यान भारतीय महिला संघाची कर्णधार हरमनप्रीत कौरने पाकिस्तानची कर्णधार फातिमा सानाशी हॅन्ड शेक करण्यास नकार दिला, ज्यामुळे ती स्तब्ध झाली.त्यामुळे पाकिस्तानला पुन्हा एकदा अपमान झाला आहे. तसेच टॉस वेळी पाकिस्तानची कर्णधार फातिमा साना हिने नाणेफेक जिंकली आणि ढगाळ वातावरणाचा हवाला देत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. आम्ही प्रथम गोलंदाजी करणार आहोत, असे दिसते की विकेटवर थोडा ओलावा असू शकतो. आमच्यासाठी एक बदल - ओमैमा सोहेलची जागा सदाफ शमास. आमचा आत्मविश्वास उत्तम आहे, आशा आहे की आम्ही आज चांगले खेळू. २५० पेक्षा कमी धावसंख्येचा पाठलाग चांगला असू शकतो,” सना म्हणाली.
advertisement
एका सक्तीच्या बदलानंतरही तिचा संघ लक्ष केंद्रित करून स्थिरावला आहे. “आम्ही विश्वचषकापूर्वी येथे चांगली मालिका खेळलो. आम्ही सकारात्मक विचार करत आहोत आणि चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न करत आहोत. एक दुर्दैवी बदल - अमनजोत खेळत नाही (ती आजारी आहे), तिच्या जागी रेणुका ठाकूर आली आहे. आम्ही एक संघ म्हणून चांगली कामगिरी केली आहे आणि आजच्या सामन्याची वाट पाहत आहोत,असे भारताची कर्णधार हरमनप्रीत कौर म्हणाली होती.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 05, 2025 5:13 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IND vs PAK :हरमनप्रीतने आधी जागा दाखवली, मग सूर्याने पाकिस्तानची उरली सुरली इज्जत काढली, मैदानात राडा