दुचाकीला इन्शुरन्स नसेल तर दंड किती लागतो? गाडी खरेदी करताना अजिबात टाळू नका विमा
- Published by:Mohini Vaishnav
Last Updated:
Bike Insurance: सध्याच्या काळात जवळपास प्रत्येकाच्या घरात दुचाकी आहे. तुम्हीही नवी गाडी घेत असाल तर इन्शुरन्सकडे दुर्लक्ष करु नका.
advertisement
ग्राहकांच्या फायद्याची बातमी आहे. कारण आयआरडीएायद्वारे कार इन्शुरन्सच्या नियमांमध्ये देखील बदल करण्यात आले आहेत. तुम्ही गाडी कशा पद्धतीने चालवता आणि किती नियम पाळतात यावर तुमच्या कार इन्शुरन्सचा प्रीमियम ठरवला जाईल. तसंच तुमच्या घरात एकापेक्षा जास्त गाड्या असल्यास, सर्वच गाड्यांना एकच इन्शरन्स लागू होईल. बाईक असो किंवा कार, यांना वेगळ्या इन्शुरन्सची गरज भासणार नाही.
advertisement
advertisement
advertisement
इन्शुरन्स नसेल तर कितीचा दंड? : मोटर व्हेईकल कायद्यानुसार रस्त्यांवर चालवण्यात येणाऱ्या सर्व वाहनांसाठी वाहन इन्शुरन्स असणे अनिवार्य असणार आहे. पॉलिसीधारकाकडे न चुकता मूलभूत थर्ड पार्टी इन्शुरन्स असणं गरजेचं आहे. यासोबतच वाहनाची मालकी असलेल्यांनी स्वतःकडे इन्शुरन्ससंबंधित डॉक्यूमेंट जवळ बाळगायला हवं. पॉलिसी डॉक्यूमेंट नसेल तर व्यक्तीकडून दोन हजारांपर्यंत दंड आकारला जातो.