पेट्रोल-डिझेल SUV विकून टाका! आली 1600 किमी रेंजची शानदार कार, किंमत ऐकून बसेल धक्का
- Published by:sachin Salve
Last Updated:
या कारचं वैशिष्ट्य म्हणजे, रेंज ही तब्बल १५०० ते १६०० किमी आहे. विशेष म्हणजे, या कारचं किंमतही 14 लाखांपर्यंत आहे. या किंमतीत भारतात हुंदई क्रेटा विकत घेता येईल.
भारतीय मार्केटमध्ये सध्या ईलेक्ट्रिक वाहनांची विक्री प्रचंड वाढली आहे. जास्त रेंज आणि दमदार बॅटरीमुळे ईव्ही गाड्या खरेदीकडे लोकांचा कल वाढला आहे. एकीकडे भारतीय मार्केटमध्ये लवकरच टेस्ला लाँच होणार आहे. तर दुसरीकडे चिनी कंपन्यांनी धुमाकूळ घातला आहे. अशातच चीन कंपनी Geely ने आपली Geely Galaxy ब्रँड अंतर्गत Starshine 8 नवीन हायब्रिड सेडान कार लाँच केली आहे.
advertisement
advertisement
Geely Galaxy Starshine 8 ही फास्टबॅक डिझान आहे. या कारची साईज 5018/1918/1480 मिमी आहे तर व्हिलबेस 2928 मिमी इतका आहे. या कारचं ड्रॅग कोएफिशिएंट 0.25Cd आहे आणि कर्ब वेट ट्रिम्सनुसार 1908 किलो आणि 1860 किलो इतकं आहे. कारमध्ये पॉवर Geely च्या Thor EM-P आणि Thor EM-i प्लग-इन हायब्रिड सिस्टम यात आहे. कारची अधिकृत टेस्ट स्पीड 80 किमी/तास इतका आहे.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
एवढंच नाहीतर कारमध्ये DeepSeek AI मॉडल सुद्धा आहे. सिलेक्टेड ट्रिम्समध्ये 25.6-इंचाचे AR-HUD सुद्धा दिले आहे. AI व्हाईस असिस्टेंट, OTA अपडेट्स, मोबाइल फोनसाठी 50W वायरलेस चार्जिंग, 256-कलर अंबियंट लाइट्स, 23-स्पीकर ऑडिओ सिस्टम, 405L चा ट्रंक स्पेस दिला आहे, या स्पेसमध्ये ५ मोठ्या बॅग ठेवता येईल, सीट व्हेंटिलेशन, हिटिंग आणि मसाज फक्शन दिलं आहे.
advertisement
ही कार लाँच झाल्यानंतर एप्रिल महिन्यात रेकॉर्ड ब्रेक अशी विक्री झाली आहे. एप्रिल 2023 मध्ये कंपनीने आपली पहिली कार आणली होती, या कारचे आतापर्यंत 930,000 पेक्षा जास्त यूनिट्सची विक्री झाली आहे. विशेष म्हणजे, जानेवरी ते एप्रिल 2025 पर्यंत Geely Galaxy ने 356,000 पेक्षा जास्त यूनिट्सची विक्री केली आहे. सध्या या कारची चीनमध्ये विक्री होत आहे. भारतात ही कार कधी लाँच होणार याबद्दल अधिकृत माहिती कंपनीकडून देण्यात आली नाही.