FASTag New Rule : टोल नाक्यांवर फास्टॅग होणार बंद? 1 मे पासून लागू होणार नवीन नियम

Last Updated:
आता 1 मे 2025 पासून टोल वसुलीच्या पद्धतीत मोठा बदल होणार आहे. त्यामुळे याबद्दल जाणून घेणं प्रत्येक गाडी चालकासाठी महत्वाचं आहे.
1/10
टोल नाक्यावरील वाहनांच्या लांब रांगा कमी करण्यासाठी फास्टॅग ही नवीन प्रणाली आणली गेली. जी गाड्यांना लावल्यानंतर त्यातून आपोआप पैसे कापले जातात. यामुळे पैसे देणे, घेणे आणि त्यासाठी लागणारा जास्तीचा वेळ या सगळ्यातून सुटका मिळते. ज्यामुळे आता बहुतांश गाड्यांना गाडी मालकांनी फास्टॅगची सुविधा जोडली आहे.

advertisement
2/10
पण आता 1 मे 2025 पासून राष्ट्रीय महामार्गांवरील टोल वसूल करण्याच्या प्रक्रियेत महत्त्वपूर्ण सुधारणा सुरू होणार आहे. टोल वसुलीच्या पद्धतीत मोठा बदल होणार आहे. त्यामुळे याबद्दल जाणून घेणं प्रत्येक गाडी चालकासाठी महत्वाचं आहे.

3/10
भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) आता टप्प्याटप्प्याने FASTag प्रणाली बंद करून त्याऐवजी जीपीएस आधारित टोल प्रणाली सुरू करणार आहे. हा निर्णय देशातील रस्ते वाहतुकीला अधिक सुलभ, वेगवान आणि पारदर्शक बनवण्यासाठी घेण्यात आला आहे.

4/10
फास्टॅग असूनही समस्या काय होत्या?फास्टॅगमुळे टोल नाक्यांवरील रांगा थोड्या कमी झाल्या होत्या. पण तरीही काही समस्या कायम राहिल्या. तांत्रिक अडचणी वारंवार निर्माण होत आहेत, ज्यामुळे अनेक ठिकाणी अजूनही लांबच लांब रांगा दिसतात.
फास्टॅग असूनही समस्या काय होत्या? फास्टॅगमुळे टोल नाक्यांवरील रांगा थोड्या कमी झाल्या होत्या. पण तरीही काही समस्या कायम राहिल्या. तांत्रिक अडचणी वारंवार निर्माण होत आहेत, ज्यामुळे अनेक ठिकाणी अजूनही लांबच लांब रांगा दिसतात.
advertisement
5/10
टॅगचा गैरवापर होण्याचे प्रमाणही वाढले आहे. या सगळ्याला आळा घालण्यासाठी आणि टोल प्रणालीला आंतरराष्ट्रीय दर्जाचं बनवण्यासाठी सरकारनं सॅटेलाइट (उपग्रह) आधारित जीपीएस टोल प्रणाली आणण्याचा निर्णय घेतला आहे.

6/10
ही नवीन प्रणाली नेमकी काय आहे?ही प्रणाली जीपीएस (GPS) आणि एएनपीआर कॅमेरे (Automatic Number Plate Recognition) तंत्रज्ञानावर आधारित आहे.
ही नवीन प्रणाली नेमकी काय आहे? ही प्रणाली जीपीएस (GPS) आणि एएनपीआर कॅमेरे (Automatic Number Plate Recognition) तंत्रज्ञानावर आधारित आहे.
advertisement
7/10
या द्वारे वाहन कुठून निघालं, कुठपर्यंत गेलं याचा रिअल टाइम डेटा मिळतो. त्यानुसार, जितकं अंतर गाडीने कापलं तितकंच टोल शुल्क आकारलं जाईल. टोल थेट चालकाच्या लिंक केलेल्या बँक खात्यातून कापला जाईल.

8/10
या नव्या पद्धतीचे फायदे काय?प्रत्येक वेळी सारखा दर नाही, तर प्रवासाच्या अंतरानुसार टोल आकारला जाईल. टोल नाक्यांवर थांबण्याची गरज नाही संपूर्ण संपर्करहित अनुभव. शिवाय यामुळे मानवी चुका आणि फसवणूक यावर नियंत्रण राहिल. वाहनचालक डिजिटली ट्रॅक करू शकतील की त्यांनी किती प्रवास केला आणि किती पैसे कट झाले.
या नव्या पद्धतीचे फायदे काय? प्रत्येक वेळी सारखा दर नाही, तर प्रवासाच्या अंतरानुसार टोल आकारला जाईल. टोल नाक्यांवर थांबण्याची गरज नाही संपूर्ण संपर्करहित अनुभव. शिवाय यामुळे मानवी चुका आणि फसवणूक यावर नियंत्रण राहिल. वाहनचालक डिजिटली ट्रॅक करू शकतील की त्यांनी किती प्रवास केला आणि किती पैसे कट झाले.
advertisement
9/10
फास्टॅग वापरणाऱ्यांनी आता काय करावं?30 एप्रिल 2025 पर्यंत फास्टॅगचा वापर शक्य आहे. त्यानंतर, आपल्या वाहनात सरकारमान्य GPS डिव्हाइस बसवणं आवश्यक आहे. आपलं बँक खाते नव्या प्रणालीशी लिंक करणं गरजेचं आहे. हे सगळं पूर्ण झाल्यावर, जुना फास्टॅग स्टिकर हटवावा लागेल.
फास्टॅग वापरणाऱ्यांनी आता काय करावं? 30 एप्रिल 2025 पर्यंत फास्टॅगचा वापर शक्य आहे. त्यानंतर, आपल्या वाहनात सरकारमान्य GPS डिव्हाइस बसवणं आवश्यक आहे. आपलं बँक खाते नव्या प्रणालीशी लिंक करणं गरजेचं आहे. हे सगळं पूर्ण झाल्यावर, जुना फास्टॅग स्टिकर हटवावा लागेल.
advertisement
10/10
थोडक्यात सांगायचं झालं तर…भारताची टोल प्रणाली आता आणखी स्मार्ट आणि सोपी होणार आहे. फास्टॅगच्या पुढचं पाऊल म्हणजे GPS टोलिंग, जिथे आपण जितकं चालवू तितकंच टोल भरू, ना रांगा, ना थांबणं, ना त्रास.

एकही सिनेमा केला नाही, तरीही बी टाऊनमध्ये सर्वात श्रीमंत; संपत्तीत शाहरुखलाही सोडलं मागे
एकही सिनेमा केला नाही, तरीही बी टाऊनमध्ये सर्वात श्रीमंत; शाहरुखलाही सोडलं मागे
    View All
    advertisement