सावधान! कारमधील प्लास्टिकची बॉटलही ठरु शकते आगीचं कारण, पण कशी?
- Published by:Mohini Vaishnav
Last Updated:
गाडीत ठेवलेल्या पाण्याच्या बाटलीमुळेही आग लागू शकते! लेन्स इफेक्टमुळे गाडीत आगीचा धोका कसा निर्माण होतो आणि तो कसा टाळता येईल हे जाणून घ्या.
advertisement
advertisement
आगीचे वैज्ञानिक कारण: लेन्स इफेक्ट (मॅग्निफायिंग इफेक्ट):पाण्याची बाटली पारदर्शक प्लास्टिकची बनलेली असेल आणि ती स्वच्छ पाण्याने भरलेली असेल, तर ती सूर्याच्या किरणांना केंद्रित करू शकते, जसे भिंग करते. जेव्हा हे केंद्रित किरण कार सीट कापड, कागद, प्लास्टिक इत्यादी कोणत्याही ज्वलनशील पदार्थावर पडते तेव्हा तेथील तापमान इतके वाढू शकते की त्यामुळे आग लागू शकते.
advertisement
advertisement
पारदर्शक पाण्याची बाटली थेट सूर्यप्रकाशात ठेवू नका.बाटली कापडाने किंवा वर्तमानपत्राने झाकून ठेवा. गाडीतील सीटवर किंवा डॅशबोर्डवर बाटली ठेवण्याऐवजी, ती थेट सूर्यप्रकाशाच्या संपर्कात येणार नाही अशा ठिकाणी दाराच्या होल्डरमध्ये ठेवा.तुमची गाडी उन्हाऐवजी सावलीत पार्क करण्याचा प्रयत्न करा. उघड्या पार्किंगपेक्षा अंडरकवर पार्किंग चांगले.