Gaurav More: गौरव मोरेनं घेतली 'ही' SUV, मायलेज आणि सेफ्टीमध्ये Maruti लाही भारी!
- Published by:sachin Salve
Last Updated:
एखाद्या मध्यमवर्गीय कुटुंबीयांसाठी सध्या ही एसयुव्ही कमी किंमत आणि दमदार मायलेज सह ५ स्टार सेफ्टी रेटिंगसाठी ओळखली जातेय.
फिल्टरपाड्याचा बच्चन अर्थात गौरव मोरे याने स्पेशल अशी SUV घेऊन सगळ्यांना आश्चर्याचा धक्का दिला. हल्ली सेलिब्रिटी हे महागड्या एसयुव्ही किंवा ईव्ही घेणे पसंत करत आहे. पण गौरव मोरे याने Skoda ची अलीकडे मार्केटमध्ये लाँच झालेली Kylaq ही SUV खरेदी केली आहे. एखाद्या मध्यमवर्गीय कुटुंबीयांसाठी सध्या ही एसयुव्ही कमी किंमत आणि दमदार मायलेज सह ५ स्टार सेफ्टी रेटिंगसाठी ओळखली जातेय.
advertisement
advertisement
advertisement
Skoda च्या MQB-A0-IN प्लॅटफॉर्मवर बनवलेल्या, Kylaq चे इंटीरियर उत्तम असंच आहे, ज्यामध्ये Apple CarPlay आणि Android Auto सह १०.०-इंच टचस्क्रीन, डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आणि मागील एसी व्हेंट्सचा समावेश आहे. भारतीय बाजारपेठेत सिंगल-पेन सनरूफ, कीलेस एंट्री, वायरलेस फोन चार्जिंग, व्हेंटिलेटेड फ्रंट सीट्स आणि लेदरेट अपहोल्स्ट्री यासारख्या मागणी असलेले फिचर्स दिले आहेत.
advertisement
advertisement
advertisement
Skoda Kylaq मध्ये १.०-लिटर, ३-सिलेंडर, टर्बोचार्ज्ड पेट्रोल इंजिन आहे जे ११५ एचपी आणि १७८ एनएम टॉर्क निर्माण करते. हे दोन ट्रान्समिशन पर्यायांमध्ये उपलब्ध आहे, एक ६-स्पीड मॅन्युअल आणि एक ६-स्पीड टॉर्क कन्व्हर्टर ऑटोमॅटिक. स्कोडाचा दावा आहे की ही एसयूव्ही १०.५ सेकंदात ०-१०० किमी प्रतितास वेग घेऊ शकते.