मर्सिडीजच्या G Wagon सारखा लूक, दणकट बॉडी, Mahindra आणली 10 लाखांमध्ये नवी SUV
- Published by:sachin Salve
Last Updated:
एकापेक्षा एक धडाकेबाज एसयूव्ही मार्केटमध्ये लाँच करणाऱ्या महिंद्रा अँड महिंद्राने आपली आणखी एक धाकट अशी एसयूव्ही लाँच केली आहे.
एकापेक्षा एक धडाकेबाज एसयूव्ही मार्केटमध्ये लाँच करणाऱ्या महिंद्रा अँड महिंद्राने आपली आणखी एक धाकट अशी एसयूव्ही लाँच केली आहे. बोलेरोचं निओ बोल्ड एडिशन लाँच करण्यात आलं आहे. महिद्राने या नवीन बोलेरोमध्ये अनेक चांगले असे फिचर्स दिले आहे. एवढंच नाहीतर लूकमध्येही थोडे बदल केले आहे. ग्रामीण भागाची शान असलेल्या बोलेरोचा आता हायटेक असा लूक आला आहे. मागील अनेक वर्षांपासून बोलेरोमध्ये कोणतेही बदल केले नव्हते पण आता एका आलिशान एसयुव्ही सारखे फिचर्स दिले आहे.
advertisement
महिंद्रा ने त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर बोलेरो आणि बोलेरो निओ बोल्ड एडिशनचा अधिकृत व्हिडिओ रिलीज केला आहे. या व्हिडिओवरून बोलेरो लोकप्रिय डायमंड व्हाइट रंगात आहे ज्याच्या बाजूला आणि दरवाजाच्या पॅनलवर तीन ग्राफिक्स आहेत. यात दोन गडद राखाडी किंवा गन मेटल फिनिश केलेल्या उभ्या स्लॅट्ससह एक कॉन्ट्रास्टिंग पूर्ण-काळ्या फ्रंट ग्रिल आहे.
advertisement
advertisement
इंटीरियर डिझाइन आणि लेआउट समान आहे तसंच ब्लूटूथ साउंड सिस्टम कायम ठेवली आहे. बोलेरो बोल्ड एडिशनच्या डिजिटल मध्ये ड्रायव्हर इन्फो सिस्टम ठेवली आहे. जी सध्याचे मायलेज, ट्रिप अंतर, उघड्या डोअर अलर्टची माहिती देतो. १४९३ सीसी डिझेल इंजिन आहे जे पॉवरट्रेन ३६०० आरपीएमवर ७५ बीएचपी आणि १६०० - २२०० आरपीएमवर २१० एनएम टार्क जनरेट करते आणि ५-स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन दिलं आहे.
advertisement
advertisement
advertisement