Maruti आता मार्केटमध्ये करणार कब्जा, पहिली EV SUV सज्ज, रेंज 500 किमी, किंमत...
- Published by:Sachin S
Last Updated:
भारतीय ऑटो इंडस्ट्रीमध्ये मागील अनेक वर्षांपासून ईलेक्ट्रिक वाहन उत्पादनामध्ये टाटा आणि महिंद्राने जोरदार आघाडी घेतली आहे. आता या रांगेत मध्यवर्गीय कुटुंबीयांची फेव्हरेट असलेल्या मारुती सुझुकी कंपनीने आता इलेक्ट्रिक सेगमेंटमध्ये एंट्री केली आहे.
भारतीय ऑटो इंडस्ट्रीमध्ये मागील अनेक वर्षांपासून ईलेक्ट्रिक वाहन उत्पादनामध्ये टाटा आणि महिंद्राने जोरदार आघाडी घेतली आहे. टाटा आणि महिंद्राने एकापेक्षा एक ईलेक्ट्रिक कार लाँच करून धडाका लावला आहे. सेडान कारपासून ते एसयूव्हीपर्यंत दोन्ही कंपन्यांनी दमदार असे मॉडेल लाँच केले आहे. आता या रांगेत मध्यवर्गीय कुटुंबीयांची फेव्हरेट असलेल्या मारुती सुझुकी कंपनीने आता इलेक्ट्रिक सेगमेंटमध्ये एंट्री केली आहे. आपली पहिली वहिली ई विटारा ( e Vitara) चं उत्पादन सुरू केलं आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते e Vitara ला हिरवा झेंडा दाखवला आहे.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
e Vitara 2025 मध्ये एलईडी प्रोजेक्टर हेडलॅम्प, इलेक्ट्रिक सनरूफ, एडीएएस सूट, ३६०-डिग्री कॅमेरा, व्हेंटिलेटेड फ्रंट सीट्स, वायरलेस मोबाइल चार्जर, ड्राइव्ह मोड, सात एअरबॅग्ज, ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल, ड्युअल १०-इंच स्क्रीन, १८-इंच अलॉय व्हील्स, फॉग लाईट्स आणि थ्री-पॉइंट एलईडी डीआरएल आणि टेललाईट्स यांचा समावेश असेल.
advertisement
advertisement
नवीन eVitara मध्ये सेफ्टीसाठी 7 एअरबॅग दिले जाणार आहे. तसंच 360-डिग्री कॅमरे,लेव्हल-2 ADAS, एंटी लॉक ब्रेकिंग सिस्टमसह EBD ची फिचर्सही दिलं आहे. यात R18 एअरोडायनामिक अलॉय व्हील्स दिले आहे, यामध्ये समोर 3-पॉइंट मॅट्रिक्स LED DRL आणि मागे लॅम्प दिला आहे. या एसयुव्हीचा 180mm चा ग्राउंड क्लिअरन्स दिला आहे. शिवाय या एसयुव्हीची लांबी 4,275mm, रुंदी 1,800mm, उंची 1,635mm आणि व्हिलबेस 2,700mm दिला आहे.
advertisement