Shocking News : वाहतूक दंडावरून वाद विकोपाला; तरुणाने भररस्त्यात महिला वाहतूक पोलिसासोबत...; मुंब्रा हादरले
Last Updated:
Youth Attacks Woman Cop : मुंब्रा येथे वाहतूक नियमभंगावर कारवाई करणाऱ्या महिला पोलिसावर तरुणाने शिवीगाळ आणि मारहाण केली. सार्वजनिक ठिकाणी घडलेल्या या घटनेनंतर पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेत गुन्हा दाखल केला.
ठाणे : मुंब्रा परिसरात कर्तव्यावर असलेल्या महिला वाहतूक पोलिसावर शिवीगाळ आणि मारहाण केल्याची गंभीर घटना समोर आली आहे. वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या दुचाकीवर कारवाई केल्याच्या रागातून एका तरुणाने महिला पोलिसावर हात उचलल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी मुंब्रा पोलीस ठाण्यात संबंधित तरुणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे.
दुचाकीवर कारवाई केल्याचा राग तरुणाच्या डोक्यात गेला
रविवारी मुंब्रा येथील एका प्रमुख चौकात महिला पोलीस कर्मचारी वाहतूक नियमनाचे कर्तव्य बजावत होत्या. याच दरम्यान एका दुचाकीस्वाराने वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याने त्यांनी त्याच्यावर दंडात्मक कारवाई केली. मात्र ही कारवाई त्याला मान्य न झाल्याने तरुणाने ''दंड का लावला?'' असा जाब विचारत वाद घालण्यास सुरुवात केली.
advertisement
तरुणाकडून महिला वाहतूक पोलिसाला मारहाण
क्षणातच हा वाद अधिकच वाढत गेला. तरुणाने महिला पोलिसाला अश्लील शिवीगाळ केली आणि थेट हात उचलत मारहाण केल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. सार्वजनिक ठिकाणी घडलेल्या या घटनेमुळे नागरिकांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली. काही वेळातच घटनास्थळी इतर पोलीस कर्मचारी दाखल झाले आणि आरोपी तरुणाला ताब्यात घेण्यात आले.
या घटनेनंतर पोलिसांनी आरोपीविरोधात सरकारी कर्मचाऱ्याच्या कर्तव्यात अडथळा आणणे, शिवीगाळ आणि मारहाण केल्याचे कलम लावून गुन्हा नोंदवला आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 07, 2026 11:14 AM IST
मराठी बातम्या/ठाणे/
Shocking News : वाहतूक दंडावरून वाद विकोपाला; तरुणाने भररस्त्यात महिला वाहतूक पोलिसासोबत...; मुंब्रा हादरले










