आता Thar विकून टाका, Tata ने आणली 627 किमी रेंजची टँकसारखी SUV, किंमतही कमी
- Published by:sachin Salve
Last Updated:
टाटाने Tata Harrier.ev लाँच करून डब्बल धमाका केला आहे. एकतर या एसयूव्ही किंमत ही या सेगमेंटमध्ये कमी ठेवली आहे तर दुसरीकडे सर्वाधिक रेंजही तब्बल 627 किमी दिली आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेली टाटा मोटर्सने आपली Tata Harrier.ev अखेर लाँच केली आहे. भारतात एकीकडे सर्वात जास्त रेंजची एसयूव्ही देण्याची स्पर्धा रंगली आहे, अशातच टाटाने Tata Harrier.ev लाँच करून डब्बल धमाका केला आहे. एकतर या एसयूव्ही किंमत ही या सेगमेंटमध्ये कमी ठेवली आहे तर दुसरीकडे सर्वाधिक रेंजही तब्बल 627 किमी दिली आहे. त्यामुळे EV SUV सेगमेंटमध्ये Tata Harrier.ev गेमचेंजर ठरणार आहे.
advertisement
ठरल्याप्रमाणे आज ३ जून रोजी टाटा मोटर्सने बहुप्रतिक्षित Harrier.ev वर पडदा बाजूला केला आहे. Tata Harrier.ev ची किंमत 21. 49 लाख रुपयांपासून सुरू होत आहे. या सगेमेंटमध्ये ही किंमत सगळ्यात कमी असल्यामुळे ईव्ही मार्केटमध्ये Tata Harrier.ev गेमचेंजर ठरणार आहे. नवीन Harrier.ev मध्ये दोन बॅटरी पॅक दिले आहे. या SUV मध्ये 65kWh आणि 75mWh बॅटरी पॅक दिला आहे.
advertisement
advertisement
SUV सेगमेंटमध्ये आतापर्यंत सर्वात जास्त रेंजही टाटा मोटर्सकडून देण्यात आली आहे. विशेष म्हणजे, Tata Harrier.ev ची बॅटरी इतक्या जलद गतीने चार्ज होते जी स्मार्टफोन चार्ज होण्यासाठी लागतो. तसंच Harrier.ev च्या बॅटरीवर लाइफ टाइम वॉरंटी दिली आहे. त्यामुळे कोणतीही चिंता न बाळगता ही एसयूव्ही तुम्ही बिनधास्तपणे चालवू शकतात.
advertisement
advertisement
advertisement