Tesla चं हे मॉडेल आहे स्वस्त! मुंबई-पुणे तर शून्य रुपये खर्चात निवांत फिरा!
- Published by:Mohan Najan
- local18
Last Updated:
Tesla Car : या दोन्ही गाड्या पूर्णपणे इलेक्ट्रिक असून त्यामध्ये आधुनिक तंत्रज्ञान, सुरक्षितता, स्मार्ट सुविधा आणि आरामदायक प्रवासाची सर्व सोय आहे.
जगप्रसिद्ध इलेक्ट्रिक वाहन निर्माता टेस्ला कंपनीने आपलं पहिलं अधिकृत शोरूम मुंबईत सुरू केलं आहे. हे शोरूम बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स परिसरात उघडलं गेलं असून, यामधून टेस्लाच्या दोन इलेक्ट्रिक गाड्या लाँच करण्यात आल्या आहेत. टेस्ला मॉडेल 3 आणि मॉडेल Y अशी या गाड्यांची नावे आहेत. या दोन्ही गाड्या पूर्णपणे इलेक्ट्रिक असून त्यामध्ये आधुनिक तंत्रज्ञान, सुरक्षितता, स्मार्ट सुविधा आणि आरामदायक प्रवासाची सर्व सोय आहे. आता पाहुयात या गाड्यांमधील खास वैशिष्ट्ये.
advertisement
टेस्लामध्ये ऑटोपायलट नावाचं खास फीचर आहे. ही प्रणाली गाडीला स्वतः चालवण्याची क्षमता देते. गाडी लेनमध्ये राहते, वेग आपोआप कमी-जास्त करते आणि समोर अडथळा आल्यास ब्रेक लावते. भविष्यात फुल सेल्फ-ड्रायव्हिंग नावाचं फीचर देखील येणार आहे, ज्यामुळे गाडी संपूर्णपणे स्वतः चालेल. टेस्लाची गाडी सुपरचार्जरने फक्त 30 मिनिटांत 80 टक्के चार्ज होते. तसेच ही गाडी घरीही चार्ज करता येते. त्यामुळे दररोजच्या वापरासाठी ती एक उत्तम पर्याय आहे.
advertisement
मॉडेल 3 एका चार्जमध्ये सुमारे 500 किलोमीटरचा प्रवास करू शकते, तर मॉडेल Y या एसयूव्ही गाडीची रेंज 530 ते 560 किलोमीटरपर्यंत आहे. लांब अंतराच्या प्रवासात ही एक विश्वासार्ह गाडी ठरते. गाडीत 15 इंचाचा टचस्क्रीन दिला आहे. यावरून नेव्हिगेशन, एसी, लाइट्स, संगीत, गियर सर्व काही चालते. याच स्क्रीनवरून युट्यूब, नेटफ्लिक्स, म्युझिक आणि गेम्सही वापरता येतात. गाडीला ओव्हर द एअर अपडेट्स मिळतात, म्हणजे ती वेळोवेळी नवनवीन फिचर्ससह अपडेट होते.
advertisement
टेस्लाची खास मोबाईल अॅप आहे. त्या अॅपमधून तुम्ही गाडी लॉक आणि अनलॉक करू शकता, चार्जिंग स्टेटस पाहू शकता, एसी चालू करू शकता आणि इतर गोष्टी नियंत्रित करू शकता. किल्लीची गरज नाही, फोन जवळ ठेवल्यावर गाडी उघडते. ही गाडी इलेक्ट्रिक असल्यामुळे तिच्यात इंजिन नाही. त्यामुळे गाडीच्या मागे आणि समोर अशा दोन ठिकाणी सामान ठेवण्याची सोय आहे. समोरील डिकीला फ्रंक म्हणतात. लांब प्रवासासाठी ही डबल स्टोरेज फारच उपयोगी आहे.
advertisement
टेस्लाच्या गाडीचा समोरील भाग अशा पद्धतीने डिझाइन केला आहे की अपघात झाल्यास धक्का लगेच शोषला जातो. यामुळे प्रवाशांना इजा होण्याची शक्यता कमी होते. समोरील डिकी हा भाग क्रम्पल झोन म्हणून काम करतो. मॉडेल Y ही एसयूव्ही गाडी आहे. ती उंच असून तिच्यात अधिक जागा, मोठं बूट स्पेस आणि सीट फोल्डिंगची सोय आहे. त्यामुळे कुटुंबासाठी किंवा लांब प्रवासासाठी ही गाडी एकदम योग्य आहे.
advertisement
advertisement