advertisement

UPSC Preparation: अधिकारी व्हायचं असेल तर...! टॉपर आदित्य श्रीवास्तव यांच्या जबरदस्त टिप्स

Last Updated:
एप्रिल 2024 मध्ये यूपीएससी 2023 परीक्षेचा निकाल जाहीर झाला. या परीक्षेत आदित्य श्रीवास्तव यांनी संपूर्ण देशात बाजी मारली. त्यानंतर पहिल्यांदा जेव्हा ते लखनऊला गेले तेव्हा विमानतळावर त्यांचं जोरदार स्वागत करण्यात आलं. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. (अंजली सिंह राजपूत, प्रतिनिधी / लखनऊ)
1/5
आदित्य श्रीवास्तव यांनी यावेळी यूपीएससीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना काही महत्त्वपूर्ण टिप्स दिल्या. जे विद्यार्थी अधिकारी होण्याचं स्वप्न उराशी बाळगून दिवस-रात्र मेहनत करत आहेत. त्यांना श्रीवास्तव म्हणाले, सामान्यतः पहिल्याच प्रयत्नात यश मिळत नाही. 2-3 वेळा प्रयत्न करावाच लागतो. त्यामुळे अजिबात निराश होऊ नये, हार मानू नये, प्रयत्न सुरू ठेवावे यश मिळेलच.

2/5
श्रीवास्तव यांनी सांगितलं की, मनसोक्त झोप, मसालेदार, चमचमीत जेवण, क्रिकेट खेळायला जाणं या सगळ्याचा त्याग करण्याची तयारी ठेवा. मी स्वतः क्रिकेट खेळणं बंद केलं, मित्रांना भेटायचो नाही, लग्नसोहळ्यांना, पार्ट्यांना जायचो नाही. झोपही कमी झाली. 10 ते 14 तास सतत अभ्यास केला. असं केलं तरच यश मिळू शकतं.

3/5
श्रीवास्तव यांनी सांगितलं की, मागील 3 वर्षांचे यूपीएससीचे पेपर सोडवले. तेव्हा मुलांनी कशी तयारी केली होती, याचा अभ्यास केला. खरंतर या 3 वर्षातील प्रश्नपत्रिकांची खूप मदत झाली. महत्त्वाचं म्हणजे श्रीवास्तव यांनी या परीक्षेसाठी कोणताही क्लास लावला नव्हता, तर स्वतः ऑनलाईन अभ्यास केला.

4/5
यश मिळवायचं असेल तर आधी अपयश पचवता यायला हवं. आपल्याच चुकांमधून आपल्याला शिकता यायला हवं, तेव्हाच चुका सुधारता येऊ शकतात, प्रगती करता येऊ शकते. मी स्वतः उत्तर लिहिताना ज्या काही चुका केल्या त्यातून शिकत गेलो, असं श्रीवास्तव म्हणाले.

5/5
सर्वात महत्त्वाचं म्हणजे श्रीवास्तव यांनी सांगितलं की, यूपीएससीची तयारी करायची असेल, तर आई-वडिलांसोबत राहूनच करा. कारण ते आपल्याला कायम प्रोत्साहित करतील आणि आपल्याला ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी चांगला मेंटल, इमोशनल सपोर्ट मिळेल.

Budget Stocks: बजेटपूर्वी मोठा ट्विस्ट, शेअर मार्केटमध्ये खळबळ; कोणाला फायदा होणार हे आधीच ठरले? 'सिक्रेट लिस्ट'ने वाढवलं टेन्शन
बजेटपूर्वी मोठा ट्विस्ट, शेअर मार्केटमध्ये खळबळ; कोणाला फायदा होणार हे आधीच ठरले
• उद्या रविवार पण सुट्टी नाही

• शेअर्सची सिक्रिट लिस्ट आली समोर

• उद्यासाठी पैसे आजच तयार ठेवा!

View All
advertisement