शिक्षक कन्येची सातासमुद्रपार भरारी, अमेरिकेत मिळालं तब्बल दीड कोटींचं पॅकेज
- Published by:News18 Marathi
Last Updated:
मराठवाड्याची कन्या शुभदाला नोकरी करत असताना आपल्याला अजून काहीतरी मोठं करायचंय, असं वाटत होतं.
जिद्दीला प्रामाणिक कष्टाची जोड दिली तर कोणतंही स्वप्न नक्की पूर्ण करता येतं. मराठवाड्याची कन्या शुभदा पैठणकर हिनं हेच दाखवून दिलंय. शिक्षक कन्या असणाऱ्या शुभदाचं सुरुवातीचं शिक्षण गावातल्या मराठी शाळेत झालं. पण आता आपल्या कर्तृत्वानं तिनं सातासमुद्रपार अमेरिकेत नाव कमावलंय. शुभदाच्या गुणवत्तेमुळं तिला एका नामांकित कंपनीत तब्बल दीड कोटी रुपयांच्या पॅकेजची नोकरी मिळाली आहे. या कामगिरीमुळे शुभदावर कौतुकाचा वर्षावर होतोय.
advertisement
शुभदा संजय पैठणकर ही मूळची <a href="https://news18marathi.com/maharashtra/jalna/">जालना जिल्ह्यातील</a> भोकरदन तालुक्यातील आहे. शुभदाचे आई वडील दोघेही शिक्षक आहेत. शुभादाने भोकरदन येथे 10 पर्यंतचं शिक्षण पूर्ण केलं. त्यांनतर तिनं 11 आणि 12 वी छत्रपती संभाजीनगर येथील सरस्वती भुवन महाविद्यालयातून पूर्ण केलं. पुढे संभाजीनगर शहरातील एका इंजिनिअरिंग कॉलेज मधून तिनं इंजीनियरिंग शिक्षण देखील पूर्ण केलं.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement


