photos : शिक्षणासाठी पैसे नव्हते तर सुरू केलं कुक्कुटपालन, आज तरुण कमावतोय लाखो रुपये
- Published by:Khushalkant Dusane
- local18
Last Updated:
अनेक जण बालपणापासून सरकारी नोकरी करण्याचे स्वप्न पाहतात. मात्र, अनेक जणांची घरची परिस्थिती नसते की त्यासाठी शक्य तितका पैसा लावता येईल आणि तयारी करता येईल. मात्र, तरीसुद्धा काही तरुण असे असतात जे व्यवसाय करुन आपले अस्तित्व सिद्ध करतात. आज अशाच एका मेहनती तरुणाची कहाणी जाणून घेऊयात. (नीरज कुमार, प्रतिनिधी)
छोटू कुमार असे या तरुणाचे नाव आहे. बिहारच्या बेगुसराय येथील रहिवासी असलेल्या या तरुणाचे लहानपणापासून सरकारी नोकरी करण्याचे स्वप्न होते. मात्र, आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने त्याला इंटरमिजिएटच्या पहिल्या वर्षाचे शिक्षण पूर्ण करता आले नाही. यानंतरही छोटूने हार न मानता आपली परिस्थिती सुधारण्यासाठी कुक्कुटपालन करण्याचा निर्णय घेतला.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement


