14 वर्षांचा संसार झटक्यात मोडला! जय भानुशाली आणि माही विज घेणार घटस्फोट; 2026 च्या सुरूवातीलाच मोठी घोषणा
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
Jay Bhanushali-Mahhi Vij Divorce: गेल्या अनेक दिवसांपासून त्यांच्या नात्यात दुरावा आल्याच्या चर्चा होत्या, पण आता खुद्द या जोडीनेच सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत आपल्या घटस्फोटाची अधिकृत घोषणा केली आहे.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
जय आणि माहीची प्रेमकथा एखाद्या बॉलिवूड सिनेमापेक्षा कमी नव्हती. एका मित्राच्या पार्टीत त्यांची पहिली भेट झाली, पण तेव्हा फारसं बोलणं झालं नाही. बरोबर एक वर्षानंतर पुन्हा एका क्लबमध्ये त्यांची भेट झाली आणि तिथेच प्रेमाची ठिणगी पडली. जयने एकदा मुलाखतीत सांगितलं होतं की, "माही ही माझी पहिली आणि शेवटची गर्लफ्रेंड होती."
advertisement
जयने ३१ डिसेंबर २००९ ला माहीला प्रपोज केलं होतं. दोघांनी परदेशात जाऊन ख्रिश्चन पद्धतीने लग्न केलं. २०११ मध्ये त्यांनी अधिकृत लग्न केलं, पण करिअरवर परिणाम होईल या भीतीने आणि मित्रांच्या मस्करीमुळे त्यांनी आपलं लग्न अनेक महिने जगापासून लपवून ठेवलं होतं. एका पार्टीत माही मंगळसूत्र घालून पोहोचली आणि तिथूनच त्यांच्या लग्नाचं गुपित जगाला कळलं.
advertisement
जय भानुशालीने एका मुलाखतीत खंत व्यक्त केली होती की, त्यांच्या लग्नाला कोणीही आलं नव्हतं. लोकांना वाटायचं की जय हा कॅसानोवा म्हणजेच खूप मुलींशी संबंध ठेवणारा आहे आणि हे लग्न टिकणार नाही. मात्र, जयने तेव्हा ठणकावून सांगितलं होतं की, "माहीने माझं पूर्ण आयुष्य बदललं आहे." आज त्याच आयुष्यातील जोडीदाराची साथ सुटल्याने चाहते सोशल मीडियावर हळहळ व्यक्त करत आहेत.
advertisement










