Actor Life: बॉलिवूड सोडलं, एका घटनेनं होत्याचं नव्हतं झालं; फेमस अभिनेत्यावर आलेली ढाब्यावर भांडी घासायची वेळ
- Published by:Sayali Zarad
Last Updated:
Actor Life: हिंदी चित्रपटसृष्टीतील एक असे अभिनेते जे प्रसिद्धीसाठी नाही पण अभिनयासाठी जगतात. आजवर अनेक वेगवेगळ्या भूमिकांनी त्यांनी प्रेक्षकांची मने जिंकली. मात्र वडिलांच्या निधनाने त्यांचं आयुष्य पूर्णच कोलमडून गेलं आणि ते वेगळ्याच ट्रॅकवर गेले.
advertisement
advertisement
संजय मिश्रा यांचा अभिनय तर सर्वांनाच माहितीय मात्र त्यांचं स्ट्रगल फार कमी लोकांना माहित आहे. संजय मिश्रा यांचा जन्म दरभंगा (बिहार) येथे झाला. त्यांचे वडील प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोमध्ये काम करत होते. वडिलांच्या बदलीमुळे त्यांनी बनारस आणि दिल्ली येथे शिक्षण घेतले. मात्र, अभ्यासात त्यांना रस नव्हता. त्यांना नेहमी रंगभूमीकडे ओढ होती. म्हणूनच त्यांनी राष्ट्रीय नाट्य विद्यालयात (NSD) प्रवेश घेतला.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
संजय मिश्रा नेहमी म्हणतात, 'अभिनय हे माझ्यासाठी काम नाही, ते ध्यान आहे.' म्हणूनच त्यांच्या प्रत्येक भूमिकेत सत्यता आणि भावना दिसते. “आँखों देखी”, “मसान”, “कडवी हवा”, “भक्षक” आणि “गोलमाल” मालिकेत त्यांनी दाखवलेला अभिनय याचा पुरावा आहे. “आँखों देखी”साठी त्यांना फिल्मफेअर क्रिटिक्स अवॉर्ड मिळाला. तसेच, “कडवी हवा”साठी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांचं कौतुक झालं.