Marathi Actress : आभाळमाया ते काजळमाया, मालिका विश्वातील ती अष्टपैलू अभिनेत्री पुन्हा छोट्या पडद्यावर!

Last Updated:
Marathi Actress : 'आभाळमाया' मालिकेतील ती प्रसिद्ध अभिनेत्री आता 'काजळमाया' या मराठी हॉरर मालिकेत दिसणार आहे. ही अभिनेत्री कोण?
1/8
मराठी टेलिव्हिजनवर नव्या मालिकांच्या निमित्तानं जुन्या अभिनेत्री पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. अशीच एक अभिनेत्री 'काजळमाया' या मालिकेच्या निमित्तानं पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. या अभिनेत्रीला पुन्हा छोट्या पडद्यावर पाहून प्रेक्षकांनीही आनंद व्यक्त केला आहे.

advertisement
2/8
'काजळमाया' ही नवी हॉरर मालिका नुकतीच स्टार प्रवाह वाहिनीवर सुरू झाली आहे. टेलिकास्ट झाल्यापासून या मालिकेच्या कथेनं प्रेक्षकांना खिळवून ठेवलं आहे.

3/8
चेटकीण वंशामधील विलक्षण सुंदर असलेल्या आणि तंत्रविद्येत प्रविण असलेल्या पर्णिका नावाच्या चेटकीणीची ही गोष्ट. तिला चिरतारुण्याचं वरदान आहे. रुपाने सुंदर असलेली पर्णिका कमालीची स्वार्थी, निर्दयी आणि संधीसाधू आहे.

4/8
चेटकीण वंश वाढवण्याचं एकमेव ध्येय तिच्या डोळ्यांसमोर आहे आणि त्यासाठी ती कोणत्याही थराला जाऊ शकते. तिच्या या महत्वाकांक्षेला जेव्हा आरुषकडून आव्हान मिळतं तेव्हा एका अद्भूत गोष्टीला सुरुवात होते ही गूढ गोष्ट काजळमाया मालिकेत दाखवण्यात आली आहे.

5/8
अभिनेता अक्षय केळकर या मालिकेत प्रमुख भूमिकेत आहे. त्याच्याबरोबर रुची जाईल ही चेटकीणीच्या भुमिकेत आहे. तर अभिनेत्री वैष्णवी कल्याणकर ही आभाच्या भुमिकेत आहे. तर ज्येष्ठ अभिनेत्री प्रिया बेर्डे यांनी चेटकीणीच्या आईची भूमिका साकारली आहे.

6/8
या पात्रांबरोबरच मालिकेत गार्गी नावाचं आणखी एक पात्र समोर आलं. अभिनेत्री समीर गुजर ही गार्गीच्या भुमिकेत आहे. समीर गुजर हिनं अनेक मराठी मालिकांमध्ये काम केलं आहे. त्यातील तिची प्रसिद्ध मालिका म्हणजे आभाळमाया. त्यानंतर आता ती काजळमाया मालिकेत दिसतेय.

7/8
गार्गीने तिच्या मंत्राने चेटकीण असलेल्या पर्णिकाचं रुपांतर दगडात करताना दाखवली आहे. पण पर्णिका देखील तिच्या मंत्राने गार्गीचं रुप बदलते आणि गावातील लोक गार्गीलाही चेटकीण समजतात.

8/8
समीर गुजर हिला पुन्हा टेलिव्हिजनवर पाहून प्रेक्षकांनी आनंद व्यक्त केला आहे. समीरा गेली अनेक वर्ष नाटक, सिनेमा, मालिका, निवेदन या क्षेत्रात सक्रीय आहे. शासनाच्या अनेक कार्यक्रमांना ती निवेदिका म्हणून उपस्थित असते. याआधी तिची प्रेमास रंग यावे ही मालिका सन मराठी वाहिनीवर सुरू होती.

Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement