Akshaye Khanna : वयाची 50 वर्ष एकट्यानं काढली, अक्षय खन्नाने का केलं नाही लग्न? शॉकिंग आहे कारण
- Published by:Minal Gurav
Last Updated:
Akshaye Khanna : अभिनेता अक्षय खन्ना सध्या धुरंधर सिनेमामुळे चर्चेत आहे. पण त्याच्या वैयक्तिक आयुष्यात मात्र तो वयाच्या 50व्या वर्षीही एकटा आहे.
बॉलिवूड अभिनेता अक्षय खन्ना पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. छावा सिनेमात त्याने साकारलेला औरंगजेब प्रेक्षकांना आवडला. छावामध्ये दमदार कामगिरी केल्यानंतर अक्षय खन्ना धुरंधर सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. अक्षय खन्नाने धुरंधरमध्ये साकारलेले रहमान डकैत प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. अक्षय खन्ना काय ताकदीचा अभिनेता आहे हे त्याने पुन्हा एकदा दाखवून दिलं आहे.
advertisement
अक्षय खन्नानं वयाच्या 22 व्या वर्षी इंडस्ट्री डेब्यू केला. त्याने अनेक सिनेमात काम केलं, अनेक सिनेमात व्हिलनचे रोल केले पण त्याला तितकंच यश मिळालं नाही. आता वयाच्या 50 व्या वर्षी अक्षय खन्ना त्याच्या अभिनयासाठी पुन्हा चर्चेत आला आहे. नव्या कलाकारांना मागे टाकून अक्षय खन्नाने त्याची नवी ओळख निर्माण केली आहे.
advertisement
अक्षय खन्ना हा दिवंगत अभिनेते विनोद खन्ना यांचा मुलगा. स्टारकिड असूनही अक्षय खन्नाला म्हणावं तितकं यश मिळालं. ऑनस्क्रिन आयुष्याबरोबर अक्षय खन्नाचं ऑफस्क्रिन आयुष्य देखील फार बरं नव्हतं. वयाची 50 वर्ष अक्षय खन्नानं एकट्यानं काढली आहे. त्याने आजही लग्न केलेलं नाही. त्याला संसार आणि मुलं नकोत. अक्षय खन्ना वयाच्या 50 व्या वर्षीही अविवाहीत का आहे याचं उत्तर त्याने स्वत:च एका मुलाखतीत दिलं होतं.
advertisement
advertisement
advertisement
अक्षय खन्नाकडे खूप झाडं आहेत. झाडांवर त्याचं खूप प्रेम आहे. झाडांप्रमाणे एखाद्या व्यक्तीवर प्रेम करावं, लग्न करावं असं कधी वाटलं नाही? असा प्रश्न विचारला असता उत्तर देत अक्षय खन्ना म्हणाला, "मी स्वतःला विवाहित असलेलं पाहू शकत नाही. कारण मला असं वाटतं की मी मॅरेज मटेरियल नाही. मी त्यासाठी बनलोच नाही."
advertisement









