...अन् 12 मिनिटांत संपवलं जीवन, डॉ. शिरीष वळसंगकर प्रकरणात नवा ट्विस्ट, मनीषा मुसळे नव्हे दुसऱ्याच महिलेचं कनेक्शन

Last Updated:

सोलापूरातील प्रसिद्ध न्यूरोफिजिशियन डॉक्टर शिरीष वळसंगकर यांनी अचानक आयुष्य संपवल्याने संपूर्ण महाराष्ट्र हादरला होता. या घटनेच्या ८ महिन्यानंतर या प्रकरणात मोठा ट्विस्ट आला आहे.

News18
News18
सोलापूरातील प्रसिद्ध न्यूरोफिजिशियन डॉक्टर शिरीष वळसंगकर यांच्या आत्महत्या प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्र हादरला होता. त्यांनी रुग्णालयातून घरी आल्यानंतर अवघ्या काही मिनिटांत डोक्यात गोळी घालून आत्महत्या केली होती. त्यांच्या रुग्णालयातील मनीषा मुसळे नावाच्या महिलेच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याची माहिती समोर आली होती. तिला पोलिसांनी या प्रकरणी अटकही केली होती. मात्र आता या घटनेच्या आठ महिन्यानंतर या प्रकरणात मोठा ट्विस्ट आला आहे. मनीषा मुसळे नव्हे तर एका दुसऱ्याच महिलेचं कनेक्शन समोर आलं आहे.
डॉ. शिरीष वळसंगकर यांनी 18 एप्रिल 2025 रोजी रात्री 8 वाजून 40 मिनिटांनी आत्महत्या केली होती. त्या अगोदर डॉक्टरांना एका महिला कर्मचाऱ्याने तीन कॉल केले असल्याची अधिकृत माहिती मनीषा मुसळेचे वकील अॅड. प्रशांत नवगिरे यांनी दिली आहे. नवगिरे यांनी दिलेल्या तपशीलामुळे आता वळसंगकर आत्महत्या प्रकरणाला वेगळं वळण मिळताना दिसत आहे.
advertisement

मनीषा मुसळेच्या वकिलांनी काय युक्तिवाद केला

अॅड. प्रशांत नवगिरे यांनी कोर्टाच्या निदर्शनास आणून दिले, की डॉ वळसंगकर यांना आत्महत्येपूर्वी 16 आणि 17 एप्रिलला पी राऊत यांचे कॉल आले होते. पी राऊत या डॉ वळसंगकर आत्महत्या प्रकरणात साक्षीदार असून वळसंगकर हॉस्पिटलमधील कर्मचारी आहेत. डिसेंबर 2024 ते 1 मे 2025 या कालावधीत डॉ वळसंगकर, पी राऊत आणि आर राऊत यांचे सीडीआर तपासा, त्यांचं टॉवर लोकेशन तपासा, अशी मागणी देखील वकिलांनी कोर्टाकडे केली आहे.
advertisement
डॉ. शिरीष वळसंगकर यांच्या आत्महत्येच्या दोन दिवस आधी त्यांना एका विशिष्ट क्रमांकावरुन कॉल आला होता. या काळात वळसंगकर यांना अनेक कॉल येऊन गेले. यातील प्रत्येक कॉल हा १ ते २ मिनिटांचा होता. मात्र संबंधित क्रमांकावरून आलेल्या कॉलवर वळसंगकर किमान २ मिनिटं ते १२ मिनिटांपर्यंत बोलले आहेत. आत्महत्येच्या आदल्या दिवशीही म्हणजेच 17 एप्रिल रोजी राऊत यांनी वळसंगकरांना तीन कॉल केले होते. यात 23 मिनिटं, ४ मिनिटं आणि 67 सेकंद संवाद साधला होता.
advertisement

आत्महत्येच्या दिवशी तीन कॉल

एवढंच नव्हे तर आत्महत्येच्या काही मिनिटं आधी देखील पी राऊत नावाच्या महिलेनं वळसंगकरांना तीन कॉल केले होते. आत्महत्येच्या १२ मिनिटं आधी वळसंगकर आणि पी राऊत यांच्यात शेवटचा संवाद झाला होता. यानंतर अवघ्या १२ मिनिटांत वळसंगकरांनी आत्महत्या केली होती, अशी धक्कादायक माहिती मनीषा मुसळे यांच्या वकिलांनी समोर आणली आहे.
advertisement

राऊतशी बोलल्यानंतर १२ व्या मिनिटांत वळसंगकरांनी संपवलं जीवन

डॉ शिरीष वळसंगकर यांनी 18 एप्रिल रोजी रात्री 8 वाजून 40 मिनिटांनी आत्महत्या केली होती. आत्महत्येच्या ४३ मिनिटं आधी डॉ वळसंगकरांना राऊत आडनावाच्या महिलेनं 7 वाजून 57 मिनिटाला कॉल केला होता. दोघांत 5 सेकंद बोलणं झालं. 8 वाजून 25 मिनिटाला - पुन्हा 31 सेकंद बोलणं झालं, तर 8 वाजून 28 मिनिटाला 18 सेकंद डॉ शिरीष वळसंगकर आणि राऊत या महिलेसोबत संभाषण झालं आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
...अन् 12 मिनिटांत संपवलं जीवन, डॉ. शिरीष वळसंगकर प्रकरणात नवा ट्विस्ट, मनीषा मुसळे नव्हे दुसऱ्याच महिलेचं कनेक्शन
Next Article
advertisement
मध्यरात्री दिल्लीत मोठी घडामोड, रविंद्र चव्हाणांनी घेतली शाहांची भेट, महायुतीबाबत काय ठरलं?
मध्यरात्री दिल्लीत मोठी घडामोड, चव्हाणांनी घेतली शाहांची भेट, महायुतीबाबत काय ठ
  • मध्यरात्री दिल्लीत मोठी घडामोड, रविंद्र चव्हाणांनी घेतली शाहांची भेट, महायुतीबाब

  • मध्यरात्री दिल्लीत मोठी घडामोड, रविंद्र चव्हाणांनी घेतली शाहांची भेट, महायुतीबाब

  • मध्यरात्री दिल्लीत मोठी घडामोड, रविंद्र चव्हाणांनी घेतली शाहांची भेट, महायुतीबाब

View All
advertisement