TV वर संस्कारी सूना, पण बॉलिवूडमध्ये बोल्ड सीन देत या अभिनेत्रींनी उडवली खळबळ

Last Updated:
TV Actress : छोट्या पडद्यावरील अनेक अभिनेत्री मालिकेत संस्कारी सून म्हणून मिरवत असल्या तरी बॉलिवूडमध्ये या अभिनेत्रींनी बोल्ड सीन देत प्रेक्षकांना थक्क केलं आहे.
1/7
 टेलिव्हिजनवरील अनेक अभिनेत्री मालिकांमध्ये अनेकदा 'संस्कारी सूने'च्या भूमिकेत दिसतात. या भूमिकांमुळे त्यांच्या विषयी एक प्रतिमा लोकांच्या मनात बनते. त्या प्रतिमेच्या अगदी विरुद्ध अवतारात त्यांना पाहणे तर दूरच, स्वीकारणेही अनेकांना कठीण जाते.

advertisement
2/7
 छोट्या पडद्यावर तुम्ही अनेक सुंदर अभिनेत्रींची ‘संस्कारी सून’ म्हणून झलक पाहिली असेल. मालिकांमध्ये संस्कारी आणि सभ्य सूनांची भूमिका साकारणाऱ्या या अभिनेत्रींची अशीच प्रतिमा वर्षानुवर्षे प्रेक्षकांच्या मनात तयार होते. पण मोठ्या पडद्यावर आल्यावर यापैकी काही अभिनेत्री बोल्ड सीन देण्यास अजिबात कचरत नाहीत. या यादीत मृणाल ठाकूर, हिना खान यांसारख्या अनेक अभिनेत्रींची नावे आहेत. मात्र, बोल्ड आणि इंटिमेट सीन देऊनही या टीव्ही अभिनेत्री बॉलिवूडमध्ये चमक दाखवू शकल्या नाहीत. पाहा, कोणत्या अभिनेत्री या यादीत आहेत.

3/7
 हिना खान : अनेक वर्षे टीव्हीवर 'संस्कारी सून' म्हणून घराघरात ओळख मिळवणाऱ्या हिना खानने ‘हॅक्ड’ या चित्रपटातून बॉलिवुडमध्ये पदार्पण केले. पहिल्याच चित्रपटात आपल्या लुक्स आणि अंदाजाने हिनाने सोशल मीडियावर खळबळ उडवली. तिने चित्रपटात अनेक बोल्ड सीनही दिले होते. पण तरीही तिला टीव्हीसारखे यश चित्रपटसृष्टीत मिळू शकले नाही.

4/7
 निया शर्मा : टीव्हीवरील संस्कारी भूमिकांमुळे लोकांच्या मनात घर करणारी निया शर्मा जेव्हा विक्रम भट्ट यांच्या ‘ट्विस्टेड’ या वेब सिरीजमध्ये दिसली, तेव्हा सर्वांचेच डोळे विस्फारले. या सीरिजमध्ये तिच्या बोल्ड अवताराने आणि इंटिमेट सीन्समुळे ती रातोरात इंटरनेट सेन्सेशन बनली. मात्र, इतक्या बोल्ड परफॉर्मन्सनंतरही निया आजकाल बॉलिवूडमध्ये फारशा फिल्म करताना दिसत नाही.

5/7
 त्रिधा चौधरी : ‘दहलीज’ मालिकेत अत्यंत संस्कारी भूमिका करणारी त्रिधा चौधरी 'आश्रम' या वेबसीरिजमध्ये बॉबी देओलसोबत बोल्ड सीन्स देताना दिसली. तिचा हा अंदाज पाहून अनेकांचे मन सुन्न झाले होते.

6/7
 प्राची देसाई : प्राचीला तिच्या पहिल्या ‘कसम से’मुळे या मालिकेत अफाट लोकप्रियता मिळाली. 2006 साली सुरू झालेली ही मालिका जवळपास चार वर्षे टीआरपीत अव्वळ स्थानी होती. ही मालिका संपल्यानंतर प्राचीसमोर ऑफर्सची रांग लागली. तिने फरहान अख्तरच्या ‘रॉक ऑन’मधून चित्रपटात पदार्पण केले. त्यानंतर ‘पार्टनर’, ‘तेरी मेरी कहानी’, ‘रॉक ऑन 2’, ‘वन्स अपॉन अ टाइम इन मुंबई’ अशा अनेक चित्रपटांत तिने काम केले. ‘वन्स अपॉन अ टाइम इन मुंबई’मध्ये प्राचीने काही बोल्ड सीन्स दिले होते आणि या भूमिकेसाठी तिला आयफा पुरस्कारही मिळाला. पण इतक्या कामगिरीनंतरही ती हळूहळू चित्रपटांमधून गायब झाली.

7/7
 सारा खान : ‘सपना बाबुल का… बिदाई’ मालिकेत संस्कारी मुलगी आणि सूनेची भूमिका करणारी सारा खान जेव्हा चित्रपटांमध्ये आली, तेव्हा तिने खूपच बोल्ड अवतार दाखवला. ‘डार्क रेनबो’, ‘एम 3’, ‘हमारी अधूरी कहानी’ अशा चित्रपटांमध्ये तिने दिलेले बोल्ड सीन्स इंटरनेटवर चर्चेचा विषय बनले. मात्र, तरीही ती बॉलिवुडमध्ये ठसठशीत ओळख निर्माण करू शकली नाही आणि नंतर तर ती इंडस्ट्रीमधून जवळजवळ गायबच झाली.

Gold Price Prediction : आताच सोनं खरेदी करावं की पुढील वर्षाची वाट पाहावी? एक्सपर्टची मोठी भविष्यवाणी
आताच सोनं खरेदी करावं की पुढील वर्षाची वाट पाहावी? एक्सपर्टची मोठी भविष्यवाणी
  • आताच सोनं खरेदी करावं की पुढील वर्षाची वाट पाहावी? एक्सपर्टची मोठी भविष्यवाणी

View All
advertisement