Accident News: 100 रूपयांच्या वस्तूमुळे गेला जीव; पुण्यात रिफ्लेक्टर नसलेल्या ट्रकला धडकून दुचाकीस्वाराचा दुर्दैवी अंत

Last Updated:

दुचाकीस्वाराने हेल्मेट घातलेले असतानाही, रस्त्यावर पडल्यानंतर मागून भरधाव वेगाने आलेल्या अज्ञात वाहनाचे चाक त्यांच्या डोक्यावरून गेले. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला.

 पुण्यात भीषण अपघात (प्रतिकात्मक फोटो)
पुण्यात भीषण अपघात (प्रतिकात्मक फोटो)
पुणे : पिंपरी-चिंचवडजवळील खेड तालुक्यात रस्ते अपघातात एका दुचाकीस्वाराला आपला जीव गमवावा लागल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. रस्त्यावर रिफ्लेक्टर नसलेल्या ट्रकला धडकून तो रस्त्यावर पडला. यानंतर दुचाकीस्वाराच्या डोक्यावरून मागून आलेल्या अज्ञात वाहनाचे चाक गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.
खेड तालुक्यातील निघोजे गावच्या हद्दीतून डोंगर वस्ती येथे महाळुंगे ते एआरएआय चौक जाणाऱ्या रस्त्यावर मंगळवारी (दि. ९) ही घटना घडली. हा अपघात सकाळी पावणे आठच्या सुमारास झाला. गिरीश एकनाथ कोठावदे (वय ४९) असे अपघातात मृत्यू झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे.
advertisement
या अपघाताला दोन व्यक्तींचा निष्काळजीपणा कारणीभूत ठरला आहे. पोलिसांनी ट्रकचालक हाकानी करीम शेख (वय ३६, रा. खालुंब्रे) आणि दुचाकीस्वाराच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या अज्ञात वाहनचालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. फिर्यादी प्रशांत कोतकर यांनी याप्रकरणी महाळुंगे एमआयडीसी पोलिसांत तक्रार दिली. ट्रकचालक हाकानी शेख याने आपल्या ट्रकला कुठलेही रिफ्लेक्टर न लावता रस्त्याच्या कडेला उभा केला होता. त्याच वेळी दुचाकीवरून जात असलेल्या गिरीश कोठावदे यांची दुचाकी उभ्या ट्रकला धडकली. धडकेमुळे कोठावदे रस्त्यावर खाली पडले.
advertisement
दुचाकीस्वाराने हेल्मेट घातलेले असतानाही, रस्त्यावर पडल्यानंतर मागून भरधाव वेगाने आलेल्या अज्ञात वाहनाचे चाक त्यांच्या डोक्यावरून गेले. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर, दुसऱ्या अज्ञात वाहनाचा चालक घटनास्थळावरून पळून गेला. महाळुंगे एमआयडीसी पोलीस या दोन्ही आरोपींचा, विशेषतः अज्ञात वाहनचालकाचा शोध घेत आहेत.
लोखंडी बकेट अंगावर पडून मृत्यू
पुण्यातील कोरेगाव पार्क परिसरात कामादरम्यान घडलेल्या एका हृदयद्रावक दुर्घटनेत एका कामगाराला आपला जीव गमवावा लागला आहे. जेसीबी यंत्राची लोखंडी बकेट डोक्यात पडून ही दुर्घटना घडली आहे. याप्रकरणी जेसीबी चालकाविरुद्ध निष्काळजीपणाने मृत्यूला जबाबदार ठरल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या विचित्र घटनेनं खळबळ उडाली आहे
view comments
मराठी बातम्या/पुणे/
Accident News: 100 रूपयांच्या वस्तूमुळे गेला जीव; पुण्यात रिफ्लेक्टर नसलेल्या ट्रकला धडकून दुचाकीस्वाराचा दुर्दैवी अंत
Next Article
advertisement
Gold Price Prediction : आताच सोनं खरेदी करावं की पुढील वर्षाची वाट पाहावी? एक्सपर्टची मोठी भविष्यवाणी
आताच सोनं खरेदी करावं की पुढील वर्षाची वाट पाहावी? एक्सपर्टची मोठी भविष्यवाणी
  • आताच सोनं खरेदी करावं की पुढील वर्षाची वाट पाहावी? एक्सपर्टची मोठी भविष्यवाणी

  • आताच सोनं खरेदी करावं की पुढील वर्षाची वाट पाहावी? एक्सपर्टची मोठी भविष्यवाणी

  • आताच सोनं खरेदी करावं की पुढील वर्षाची वाट पाहावी? एक्सपर्टची मोठी भविष्यवाणी

View All
advertisement