Bigg Boss 19 Winner : ग्रँड फिनालेआधीच 'बिग बॉस 19'च्या विजेत्याचं नाव लीक! प्रसिद्ध ज्योतिषांची भविष्यवाणी खरी ठरणार?
- Published by:Manjiri Pokharkar
Last Updated:
Bigg Boss 19 Winner Name : 'बिग बॉस 19'च्या विजेत्याची घोषणा अवघ्या काही तासांत होणार आहे. दरम्यान या पर्वाच्या विजेत्याचं नाव लीक झालं आहे.
'बिग बॉस 19' या बहुचर्चित कार्यक्रमाच्या विजेत्याची घोषणा अवघ्या काही तासांत होणार आहे. 7 डिसेंबर 2025 रोजी या पर्वाचा दिमाखदार ग्रँड फिनाले पार पडणार आहे. 'बिग बॉस 19'च्या TOP 5 स्पर्धकांमध्ये गौरव खन्ना, तान्या मित्तल, प्रणित मोरे, अमाल मलिक आणि फरहाना भट्ट या स्पर्धकांचा समावेश आहे. या पाच पैकी एक स्पर्धक 'बिग बॉस 19'च्या ट्रॉफीवर आपलं नाव कोरणार आहे.
advertisement
'बिग बॉस 19'च्या विजेत्याचं नाव विकिपीडियावर लीक होत आहे. विजेत्याच्या नावाचा स्क्रिनशॉट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. विकिपीडियावर व्हायरल होणाऱ्या स्क्रिनशॉटमध्ये गौरव खन्ना (Gaurav Khanna) या पर्वाचा विजेता असल्याचं म्हटलं जात आहे. तर तान्या मित्तल, प्रणित मोरे, फरहाना भट्ट आणि अमाल मलिक हे स्पर्धक या पर्वाचे फायनलिस्ट असल्याचं लिहिलं गेलं आहे. तसेच इतर स्पर्धकांच्या इविक्शनचीदेखील यात नोंद करण्यात आली आहे.
advertisement
advertisement
एका प्रसिद्ध महिला ज्योतिषांना होस्ट 'बिग बॉस 19'चा विजेता कोण होणार? याबाबत प्रश्न विचारते. या प्रश्नाचं उत्तर देत या महिला ज्योतिषी म्हणतात,"टॉप 2'मध्ये फरहाना भट्ट आणि गौरव खन्ना या दोन स्पर्धकांचा समावेश असेल. 'बिग बॉस 19'चा सीझन गौरव खन्ना जिंकण्याची शक्यता जास्त आहे. गौरव खन्ना कोणत्याही शोमध्ये गेला तरी तोच विजेता होईल. सध्या त्याचं लक खूप चांगलं आहे".
advertisement
सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या आणखी एका व्हिडीओमध्ये गौरव खन्नाच्या कुंडलीचे विश्लेषण केले जात आहे आणि हे सांगितले जात आहे की गौरव खन्ना विजेता का ठरू शकतो. सध्या गौरव खन्नावर ना शनीची साडे साती आहे ना साडे धैय्या, त्यामुळे जिंकण्यात कोणतीही मोठी अडचण दिसत नाही. कुंडली पाहता असे लक्षात येते की सध्या चंद्र आणि शुक्र यांच्यात चांगले योग तयार होत आहेत. ज्यामुळे गौरव खन्नासाठी हा काळ अद्भुत यश आणि लोकप्रियतेचे संकेत देतो. त्याचवेळी कन्या राशीत शनी आणि मंगळ एकत्र आल्याने तीक्ष्ण बुद्धी, रणनीती आणि स्मार्ट खेळाची चिन्हे दिसत आहेत. कन्या ही बुद्धी आणि कौशल्याची रास मानली जाते आणि असे लोक प्रत्येक कलेत निपुण असतात. या सर्व कारणांमुळे गौरव खन्नाच्या 'बिग बॉस 19' चे विजेतेपद जिंकण्याची शक्यता अधिक मानली जात आहे.
advertisement
तज्ञांच्या मते, फरहाना भट्ट आणि गौरव खन्ना या दोन्ही स्पर्धकांची ग्रहदशा दर्शवते की आगामी आठवडे त्यांच्या दोघांसाठी खूपच शुभ राहू शकतात आणि दोघांकडेही शो जिंकण्याची क्षमता आहे. ज्योतिषाचार्य सांगतात की फरहानाच्या ग्रहांमध्ये सध्या सकारात्मक बदल होत आहेत. चंद्र आणि गुरूची अनुकूल स्थिती असल्याने तिची लोकप्रियता सातत्याने वाढू शकते. असे मानले जाते की या ग्रहस्थितीमुळे फरहानाला प्रेक्षकांचा पाठिंबा मोठ्या प्रमाणावर मिळत राहील.
advertisement


