Guess Who : काँग्रेस नेत्याची मुलगी, हॉट लुकमुळे सतत असते चर्चेत, सुपरहिट सिनेमांत केलंय काम
- Published by:Manjiri Pokharkar
Last Updated:
Bollywood Actress : बॉलिवूड गाजवणाऱ्या अभिनेत्रीचे वडील काँग्रेसचे नेते आहेत. अनेक सुपरहिट चित्रपटांत अभिनेत्रीने काम केलं आहे.
advertisement
advertisement
नेहा शर्माचा जन्म बिहारमधील भागलपूर येथे झाला. तिचे वडील अजीत शर्मा हे बिहारमधील काँग्रेस नेते आहे. काही दिवसांपूर्वी नेहा शर्मा आपल्या वडिलांच्या निवडणूक प्रचारादरम्यान दिसली होती. सोशल मीडियावर प्रचारादरम्यानचे अभिनेत्रीचे फोटो व्हायरल झाले होते. नेहाची बहीण आयशा शर्मा अभिनेत्री असून ती जॉन अब्राहमसोबतच्या चित्रपटात दिसली आहे. तर तिची दुसरी बहीण रितिका शर्मा इंडस्ट्रीपासून दूर आहे.
advertisement
नेहा शर्माने 2007 मध्ये 'चिरुथा' या तेलुगू चित्रपटाच्या माध्यमातून आपल्या करिअरची सुरुवात केली. त्यानंतर 2010 मध्ये तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. क्रूक हा तिचा पहिला बॉलिवूडपट होता. या चित्रपटात नेहा शर्मा इमरान हाशमीसोबत स्क्रीन शेअर करताना दिसली. बॉक्स ऑफिसवर जादू दाखवण्यात हा सिनेमा कमी पडला. पण नेहाचा अभिनय आणि ग्लॅमरस लुकने चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं.
advertisement
advertisement
नेहाला तिच्या चित्रपटांपेक्षा तिच्या ग्लॅमर आणि फॅशन सेन्ससाठी अधिक ओळखले जाते. तिने एनआयएफटी (नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी) मधून फॅशन डिझाइनिंगचे शिक्षण घेतले आहे. सोशल मीडियावर तिची प्रचंड फॅन फॉलोइंग आहे. इंस्टाग्रामवर तिचे 20 दशलक्षांहून अधिक फॉलोअर्स आहेत. तिचे फोटो आणि रील्स अनेकदा व्हायरल होतात. नेहा फिटनेस शौकीनदेखील आहे.
advertisement


