Chhaya Kadam : मराठमोळ्या छाया कदमचा बॉलिवूडमध्ये डंका! Filmfare वर कोरलं नाव; म्हणाली,"एका मराठी मुलीला..."
- Published by:Manjiri Pokharkar
Last Updated:
Chhaya Kadam Filmfare Awards 2025 : जगभरात आपल्या अभिनयाची भुरळ पाडणाऱ्या छाया कदम यांनी बड्या स्टार्सला मागे टाकत 'फिल्मफेअर पुरस्कार 2025' पटकावला आहे.
मराठमोळी अभिनेत्री छाया कदम गेल्या दोन वर्षांपासून चांगलीच चर्चेत आहे. आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळवत जगभरात त्यांनी आपल्या अभिनयाची भुरळ पाडली आहे. विविध धाटणीचे चित्रपट घेऊन त्या प्रेक्षकांच्या भेटीला आल्या आहेत. आता इंडस्ट्रीत मानाच्या समजल्या जाणाऱ्या फिल्मफेअर पुरस्कारावर त्यांनी आपलं नाव कोरलं आहे.
advertisement
advertisement
advertisement
छाया कदम पुढे म्हणाल्या,"एका मराठी मुलीला या प्रोजेक्टचा भाग केल्याबद्दल आभार. मला स्वत:वर विश्वास नव्हता की मी या पात्राला न्याय देऊ शकेल. किरणने माझा विश्वास वाढवला. शेवटी एवढचं सांगेल हा पुरस्कार त्यांच्यासाठी आहे जे इंडस्ट्रीत अनेक वर्षांपासून काम करत आहेत आणि मेरा टाईम कब आएगा असा विचार करत आहेत".
advertisement
advertisement
advertisement








