प्रेम, तडजोड आणि ते वचन… धर्मेंद्र गेल्यानंतही हेमा मालिनींनी ओलांडला नाही त्यांच्या घराचा उंबरठा
- Published by:Minal Gurav
Last Updated:
अभिनेत्री हेमा मालिनी यांचं धर्मेंद्र यांच्यावर जीवापाड प्रेम होतं. त्यांनी विवाहित धर्मेंद्रंशी लग्न केलं आणि त्यानंतर त्यांच्या वाट्याला अनेक तडजोडी आल्या. एकमेकांना दिलेल्या प्रेमाची वचनं पाळून त्यांनी 45 वर्षांचा संसार केला. हेमा मालिनी यांनी धर्मेंद्र यांना दिलेलं वचन शेवटपर्यंत पाळलं. त्यांनी त्यांच्या मृत्यूनंतरही त्यांच्या घराचा उंबरठा ओलांडला नाही.
अभिनेत्री हेमा मालिनी आणि धर्मेंद्र मोठ्या पडद्यावरची हिट जोडी होती. हेमा मालिनी आणि धर्मेंद्र यांनी अनेक सिनेमात एकत्र काम केलं. पण खऱ्या आयुष्यात ही जोडी फार काळ एकत्र राहिली नाही. 45 वर्षांआधी हेमा मालिनी यांनी धर्मेंद्र यांना दिलेला शब्द पाळला. त्यांच्या मृत्यूनंतरही त्यांनी त्यांच्या घराचा उंबरठा ओलांडला नाही.
advertisement
बॉलिवूडचे ही मॅन अभिनेते धर्मेंद्र यांचं 24 नोव्हेंबर 2025 रोजी वयाच्या 89 व्या वर्षी निधन झालं. धर्मेंद्र यांच्या निधनाची माहिती मिळताच इंडस्ट्री हळहळली. नुकतीच धर्मेंद्र यांची प्रेयर मिटिंग आयोजित करण्यात आली. यावेळी बॉलिवूडमधील अनेक दिग्गज कलाकारांनी हजेरी लावली होती. सेलीब्रेशन ऑफ लाइफ असं नाव या प्रेयर मीटिंगला देण्यात आलं होतं. मुंबईतील वांद्रे येथे ही प्रेयर मीटिंग आयोजित करण्यात आली होती.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
45 वर्षांआधी हेमा मालिनी यांनी विवाहित आणि चार मुलांचे पिते असलेल्या धर्मेंद्र यांच्याबरोबर लग्न केलं. त्यांच्या लग्नानंतर खूप गदारोळ झाला होता. लग्नानंतर हेमा मालिनी कधीच त्यांच्या जुहूतील घरी गेल्या नाही. त्या घरी त्यांची पहिली पत्नी प्रकाश कौर राहतात. लग्नानंतर हेमा यांनी धर्मेंद्र यांच्याबरोबर खूप कमी वेळ घालवला. "मी त्यांच्याशी लग्न केलं आणि पण मला त्यांना त्यांच्या पहिल्या कुटुंबापासून दूर करायचं नाही", असं त्या म्हणाल्या होत्या. हेमा मालिनी यांनी कायमच प्रकाश कौर आणि त्यांच्या मुलांचा आदर ठेवला. 45 वर्षांनंतरही तो आदर कायम असल्याचं दिसलं.


