Neetu-Rishi Love Story : जिच्याकडून गर्लफ्रेंडसाठी पत्र लिहून घ्यायचे, शेवटी तिच्याच प्रेमात पडले, कशी सुरु झाली ऋषी-नीतूची लव्ह स्टोरी?

Last Updated:
Neetu Kapoor Rishi Kapoor Love Story : बॉलिवूडमध्ये अनेक प्रेमकथा गाजल्या, पण काही कथा इतक्या हळव्या असतात की त्या काळानं कितीही पुढे गेलं तरी लोकांच्या आठवणीत राहतात. अशीच एक सुंदर, हृदयस्पर्शी प्रेमकहाणी आहे ऋषी कपूर आणि नीतू सिंग यांची.
1/7
बॉलिवूडमध्ये अनेक प्रेमकथा गाजल्या, पण काही कथा इतक्या हळव्या असतात की त्या काळानं कितीही पुढे गेलं तरी लोकांच्या आठवणीत राहतात. अशीच एक सुंदर, हृदयस्पर्शी प्रेमकहाणी आहे ऋषी कपूर आणि नीतू सिंग यांची.

advertisement
2/7
आज ऋषी कपूर आपल्यात नाहीत, पण नीतू सिंगच्या आठवणीत, चाहत्यांच्या मनात आणि चित्रपटसृष्टीत त्यांचं प्रेम आजही जिवंत आहे. दोघांची पहिली ओळख आर. के. स्टुडिओमध्ये झाली होती. मात्र खरी जवळीक निर्माण झाली ती ‘जहरीला इंसान’ चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान.

3/7
नीतू सिंग तेव्हा फक्त 15 वर्षांची होती आणि पहिल्या भेटीत तिला ऋषी कपूर अजिबात आवडले नव्हते. कारण ऋषी तिची सतत चेष्टा करत, त्रास देत. पण हळूहळू हे भांडण मैत्रीत आणि मग प्रेमात बदललं.

4/7
 त्यावेळी ऋषी कपूर यास्मिन मेहता नावाच्या पारसी मुलीला डेट करत होते. ऋषी कपूर गर्लफ्रेंडसाठी नीतूकडून लव्ह लेटर लिहून घ्यायचे. पण त्यांचं नातं फार काळ टिकलं नाही. मात्र नंतर ते नीतू यांच्या प्रेमात पडले.

5/7
 ऋषी कपूरचं नीतूवरचं प्रेम त्याच्या वागण्यातून, पत्रांतून, आणि त्यांच्या एकत्र कामातून स्पष्ट दिसायचं. त्यांनी 'कभी कभी', 'अमर अकबर अँथनी', 'दूसरा आदमी', 'राजा', 'झूठा कहीं का' अशा अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं. दोघांची जोडी प्रेक्षकांनी डोक्यावर घेतली.

6/7
 मैत्री, भांडण आणि नंतर दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले. चित्रपटाच्या शूटिंगसाठी ऋषी कपूर युरोपमध्ये गेले असताना त्यांना नीतूची खूप आठवण येऊ लागली. नीतूशिवाय आपल्याला राहता येत नाही, हे त्यांना त्यावेळी जाणवले. त्यांनी नीतूला युरोपमधून एक टेलीग्राम पाठवला, ज्यामध्ये लिहिले होते,
मैत्री, भांडण आणि नंतर दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले. चित्रपटाच्या शूटिंगसाठी ऋषी कपूर युरोपमध्ये गेले असताना त्यांना नीतूची खूप आठवण येऊ लागली. नीतूशिवाय आपल्याला राहता येत नाही, हे त्यांना त्यावेळी जाणवले. त्यांनी नीतूला युरोपमधून एक टेलीग्राम पाठवला, ज्यामध्ये लिहिले होते, "मला तुझी खूप आठवण येतेय... ही सिखणी मला खूप आठवतेय." नीतूला हे वाचून खूप आनंद झाला आणि तिने आपल्या कुटुंबातील सदस्यांना तो टेलीग्राम दाखवला.
advertisement
7/7
 22 जानेवारी 1980 रोजी ऋषी कपूर आणि नीतू सिंग यांचा विवाह झाला. हे लग्न बॉलिवूडमधील सर्वात भव्य आणि गाजलेल्या विवाहांपैकी एक होते.

Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement