'कोणतीही वाईट शक्ती...' Dhurandhar चं कौतुक करत श्रद्धा कपूरने केली बॉलिवूडची पोलखोल, Negative PR बद्दल म्हणाली...

Last Updated:
Shraddha Kapoor Praises Dhurandhar: अभिनेत्री श्रद्धा कपूरने या चित्रपटाचे कौतुक करताना थेट बॉलिवूडमधील राजकारण आणि निगेटिव्ह पीआरबद्दल आपलं रोखठोक मत व्यक्त करत चित्रपटाचं तोंडभरून कौतुक केलं आहे.
1/8
मुंबई: दिग्दर्शक आदित्य धर यांचा 'धुरंधर' चित्रपट बॉक्स ऑफिसवर ५०० कोटींहून अधिक कमाई करत ब्लॉकबस्टर ठरला आहे. रणवीर सिंग, अक्षय खन्ना, अर्जुन रामपाल यांसारख्या कलाकारांनी अफलातून काम केलेल्या या स्पाय-थ्रिलरचे कौतुक केवळ प्रेक्षकच नाही, तर सेलिब्रिटीही करत आहेत.

advertisement
2/8
पण, अभिनेत्री श्रद्धा कपूरने या चित्रपटाचे कौतुक करताना थेट बॉलिवूडमधील राजकारण आणि निगेटिव्ह पीआरबद्दल आपलं रोखठोक मत व्यक्त करत चित्रपटाचं तोंडभरून कौतुक केलं आहे.
पण, अभिनेत्री श्रद्धा कपूरने या चित्रपटाचे कौतुक करताना थेट बॉलिवूडमधील राजकारण आणि निगेटिव्ह पीआरबद्दल आपलं रोखठोक मत व्यक्त करत चित्रपटाचं तोंडभरून कौतुक केलं आहे.
advertisement
3/8
सोमवारी 'धुरंधर' पाहिल्यानंतर श्रद्धा कपूरला तिचा आनंद आवरता आला नाही. तिने इन्स्टाग्रामवर एकापाठोपाठ एक स्लाईड्स शेअर करून आपली प्रतिक्रिया दिली. पहिल्या स्लाईडवर तिने लिहिले,
सोमवारी 'धुरंधर' पाहिल्यानंतर श्रद्धा कपूरला तिचा आनंद आवरता आला नाही. तिने इन्स्टाग्रामवर एकापाठोपाठ एक स्लाईड्स शेअर करून आपली प्रतिक्रिया दिली. पहिल्या स्लाईडवर तिने लिहिले, "आदित्य धरने 'धुरंधर'सारखा चित्रपट बनवणे खरंच खूप वाईट आहे..."
advertisement
4/8
आणि दुसऱ्या स्लाईडवरचा तिचा मेसेज अधिक स्पष्ट होता:
आणि दुसऱ्या स्लाईडवरचा तिचा मेसेज अधिक स्पष्ट होता: "...आणि मग आम्हाला 'पार्ट २' साठी तीन महिने वाट पाहायला लावणे. आमच्या 'इमोशन्स'शी खेळू नका. कृपया रिलीज डेट प्रीपॉन करा!" श्रद्धाची ही मागणी तिच्या आणि चाहत्यांच्या भावना दर्शवते की, 'धुरंधर'चा पुढील भाग पाहण्यासाठी प्रेक्षक किती उत्सुक आहेत. यासोबतच तिने या वर्षी सुपरहिट ठरलेल्या 'छावा', 'सैयारा' या चित्रपटांचेही कौतुक केले.
advertisement
5/8
श्रद्धा कपूर केवळ चित्रपटाचे कौतुक करून थांबली नाही, तर तिने निर्मात्यांना त्रास देणाऱ्या निगेटिव्ह पीआरवर थेट निशाणा साधला. ती म्हणाली,
श्रद्धा कपूर केवळ चित्रपटाचे कौतुक करून थांबली नाही, तर तिने निर्मात्यांना त्रास देणाऱ्या निगेटिव्ह पीआरवर थेट निशाणा साधला. ती म्हणाली, "यामी गौतमला निगेटिव्ह पीआर यंत्रणा आणि बनावट विवादांना तोंड द्यावे लागले. 'धुरंधर'ने हे सर्व सहन केले आणि शानदारपणे यशस्वी झाला. कोणतीही वाईट शक्ती चांगल्या चित्रपटाला खाली खेचू शकत नाही. आम्हाला प्रेक्षकांवर विश्वास आहे!"
advertisement
6/8
यामी गौतम ही 'धुरंधर'चे दिग्दर्शक आदित्य धर यांची पत्नी आहे आणि श्रद्धाने या निमित्ताने यामीला त्रास देणाऱ्या 'बॉलिवूड गँग'वर अप्रत्यक्ष टीका केली आहे, असे मानले जात आहे.
यामी गौतम ही 'धुरंधर'चे दिग्दर्शक आदित्य धर यांची पत्नी आहे आणि श्रद्धाने या निमित्ताने यामीला त्रास देणाऱ्या 'बॉलिवूड गँग'वर अप्रत्यक्ष टीका केली आहे, असे मानले जात आहे.
advertisement
7/8
'धुरंधर' हा चित्रपट एका गुप्तहेराची रोमांचक कहाणी आहे, जो पाकिस्तानच्या लियारीमधील कुख्यात गँगस्टर रहमान डकैतच्या टोळीत घुसतो. या घुसखोरीचा उद्देश दहशतवादी कारवाया थांबवणे आणि आयएसआय (ISI) सोबतचे त्यांचे संबंध उघड करणे हा आहे.

8/8
रणवीर सिंग, अक्षय खन्ना, संजय दत्त आणि आर. माधवन यांच्या दमदार अभिनयामुळे या चित्रपटाला अभूतपूर्व यश मिळाले आहे. 'धुरंधर'चा मोस्ट अवेटेड सीक्वल १९ मार्च २०२६ रोजी रिलीज होणार आहे, जिथे त्याची टक्कर यशच्या 'टॉक्सिक: ए फेअरीटेल फॉर द ग्रोन-अप्स' या चित्रपटाशी होणार आहे.

Gold Silver Price Today: ग्राहकांना गुड न्यूज, गुंतवणूकदारांना टेन्शन! दुसऱ्या दिवशी सोनं-चांदीच्या किंमती गडगडल्या,  आजचा दर काय?
ग्राहकांना गुड न्यूज, गुंतवणूकदारांना टेन्शन! सोनं-चांदीच्या किंमती गडगडल्या, आ
  • ग्राहकांना गुड न्यूज, गुंतवणूकदारांना टेन्शन! दुसऱ्या दिवशी सोनं-चांदीच्या किंमत

  • ग्राहकांना गुड न्यूज, गुंतवणूकदारांना टेन्शन! दुसऱ्या दिवशी सोनं-चांदीच्या किंमत

  • ग्राहकांना गुड न्यूज, गुंतवणूकदारांना टेन्शन! दुसऱ्या दिवशी सोनं-चांदीच्या किंमत

View All
advertisement