ओटीटीवरील या 5 वेब सीरिजमध्ये भरभरून भरलाय सस्पेन्स आणि ट्विस्ट; ही घ्या list, आजच एक पाहून टाका...

Last Updated:
Best Suspense Web Series : नेटफ्लिक्सवर 'शी', 'अरण्यक', 'कोहरा', 'ये काली काली आंखे' आणि 'जामताडा' यांसारख्या वेब सीरिजमध्ये सस्पेन्स आणि जबरदस्त ट्विस्ट पाहायला मिळतील.
1/5
 शी (She) : एका सामान्य पोलिस कॉन्स्टेबलची कथा 'शी' या वेबसीरिजमध्ये दाखवण्यात आली आहे. अदिती पोहनकर या सीरिजमध्ये मुख्य भूमिकेत आहे. ‘आश्रम’ फेम अदितीने या सीरिजमध्ये आपल्या अभिनयाची छाप पाडली आहे. आदीती वर्दीत शत्रूंशी लढताना दिसते. ‘शी’ या सीरिजच्या कथेबद्दल बोलायचं झालं तर भूमी (अदिती पोहनकर) ही मुंबई पोलिस दलातील एक प्रामाणिक कॉन्स्टेबल आहे. कधी ती तुम्हाला लाजरी-बुजरी वाटेल तर कधी घाबरट, पण आपल्या कामात ती अत्यंत प्रामाणिक असते. तिला एका अंडरकव्हर मिशनवर पाठवले जाते, जिथे तिला एका धोकादायक ड्रग माफिया गँगचा पर्दाफाश करायचा असतो. या दरम्यान ती अनेक अडचणींना सामोरी जाते. या सीरिजमध्ये ग्लॅमरसोबतच एक दमदार कथा देखील पाहायला मिळते. आतापर्यंत या सीरिजचे दोन सीझन आले आहेत. जर तुम्हाला ही सीरिज पाहायची असेल, तर ती नेटफ्लिक्सवर उपलब्ध आहे.

advertisement
2/5
 अरण्यक (Aranyak) : रवीना टंडनने 90 च्या दशकात प्रेक्षकांच्या हृदयावर राज्य केलं होतं, पण आजच्या काळात ती ओटीटीवर देखील तितकीच धडाकेबाज कामगिरी करत आहे. तिने ओटीटीवर यशस्वीपणे पदार्पण केलं. 2021 मध्ये तिने नेटफ्लिक्सवरील ‘अरण्यक’ या वेब सीरिजच्या माध्यमातून पदार्पण केलं. या वेबसीरिजमध्ये रवीना एका महिला पोलीस अधिकारीच्या भूमिकेत दिसली. या सिरीजमध्ये तिने पुन्हा एकदा आपल्या दमदार अभिनयाची झलक दाखवली आहे. IMDb वरही या सीरिजला 7.7 ची रेटिंग मिळाली आहे. कथेबद्दल बोलायचं झालं तर, ‘अरण्यक’ ही कथा हिमाचल प्रदेशातील एका काल्पनिक डोंगराळ गावाची आहे. जिथे घडलेल्या एका रहस्यमय मर्डर केसमुळे संपूर्ण गाव हादरून जातं. परमब्रत चट्टोपाध्याय, आशीष विद्यार्थी, इंदुश्री गोयल, मेघना मलिक यांसारख्या कलाकार या सीरिजमध्ये मुख्य भूमिकेत आहेत. या सिरीजमध्ये एकूण 8 एपिसोड्स आहेत. विनय वायकुळने या सीरिजच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे.

3/5
 कोहरा (Kohrra) : 'कोहरा' या वेबसीरिजला IMDB वर 7.5 रेटिंग मिळाली आहे. सुविंदर विक्की, बरुण सोबती, रचित शर्मा, मनोज पहवा आणि विक्रम कोचर यांसारखे कलाकार 'कोहरा' सीरिजमध्ये मुख्य भूमिकेत आहेत.'कोहरा'ची कथा पंजाबमधील एका छोट्या गावामधून सुरू होते, जिथे एका NRI व्यक्तीच्या लग्नाच्या काही दिवस आधी एक रहस्यमय हत्या होते. या घटनेमुळे संपूर्ण पंजाब हादरून जातं. लग्नाच्या अगोदर नेमकं कोण आणि का हे खून करतं, याचा शोध घेण्यासाठी दोन पोलिस अधिकारी बलबीर सिंग (सुविंदर विक्की) आणि गॅरी बरा (बरुण सोबती) यांना या केसची चौकशी करण्यासाठी बोलावलं जातं. हे दोघं मिळून या केसच्या खोलवर जातात आणि या तपासात त्यांना फॅमिली ड्रामा, फसवणूक, खोटं, आणि अनेक रहस्यं उघडकीस येतात. प्रत्येक एपिसोडमध्ये एक नवा सस्पेन्स आणि ट्विस्ट पाहायला मिळतो. या सीरिजची खासियत म्हणजे पंजाबची खरी पार्श्वभूमी, भाषा आणि संस्कृती अगदी बारकाईने दाखवलेली आहे.

4/5
 ये काली काली आंखें (Yeh Kaali Kaali Ankhein) : ‘ये काली काली आंखें’ ही वेब सीरिज 2020 मध्ये रिलीज झाली होती. आतापर्यंत या सीरिजचे 2 सीझन आले आहेत. यात श्वेता त्रिपाठी आणि ताहिर भसीन मुख्य भूमिकांमध्ये आहेत. त्यांच्यासोबत सौरभ शुक्ला, बृजेंद्र काला आणि अनंत जोशी हे देखील महत्त्वाच्या भूमिकांमध्ये आहेत. ही सीरिज रोमँटिक थ्रिलर असून त्यात सस्पेन्सचा जबरदस्त डोस आहे. IMDb वर या वेब सीरिजला 7 रेटिंग मिळाली आहे. या वेब शोमध्ये तुम्हाला प्रेम, जिद्द आणि वेडसरपणा एकत्र पाहायला मिळेल. विक्रांत (ताहिर भसीन) आणि शिखा (श्वेता त्रिपाठी) यांची प्रेमकहाणी या वेबसीरिजमध्ये दाखवण्यात आली आहे. पण कथा खऱ्या अर्थाने रंगतदार होते जेव्हा विक्रांतच्या आयुष्यात एक श्रीमंत आणि हट्टी मुलगी पूर्वा (आंचल सिंह) येते. पूर्वा आपल्या प्रेमासाठी काहीही करण्यास तयार असते. याच लव्ह ट्रँगलवर ही सीरिज आधारित आहे. जी तुम्हाला शेवटपर्यंत खिळवून ठेवते.

5/5
 जामताडा (Jamtara-Sabka Number Ayega) : स्पर्श श्रीवास्तव, मोनिका पंवार, अमित सियाल, दिब्येंदु भट्टाचार्य, अंकुश राजा, अक्षित अत्री आणि आस्था चौधरी यांसारख्या कलाकारांनी सजलेली ‘जामताडा’ ही सीरिज वीकेंडला पाहण्यासाठी एक उत्तम पर्याय आहे. ही सिरीज सायबर क्राईमवर आधारित असून यात ड्रामासोबत भरपूर सस्पेन्स भरलेला आहे. सौमेंद्र पाधी यांच्या दिग्दर्शनाखाली बनलेली ही सीरिज 2020 मध्ये रिलीज झाली होती आणि प्रेक्षकांनी तिला भरभरून प्रेम दिलं. यामध्ये कुठलाही मोठा चेहरा नसतानाही, कन्टेंटच्या जोरावर हिला खूप यश मिळालं, आणि त्याच लोकप्रियतेमुळे 2022 मध्ये दुसरा सीझनदेखील रिलीज करण्यात आला.

OTT Movie: बोल्ड सीन्सने भरलेला सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका; 2 तास 28 मिनिटांची कहाणी ओटीटीवर हिट
2 तास 28 मिनिटांचा बोल्ड सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका
    View All
    advertisement