Guess Who : बॉलिवूडचा एकमेव दिग्दर्शक, ज्याच्या नावे नाही एकही फ्लॉप; हिरो-हिरोईन नव्हे ही व्यक्ती आहे लकी चार्म!

Last Updated:
Bollywood : बॉलिवूडमधील एका लोकप्रिय दिग्दर्शकावर आजवर एकदाही फ्लॉपचा ठपका पडलेला नाही. पण त्यांचा लकी चार्म मात्र हिरो-हिरोईन नाही आहेत.
1/7
 अनेकदा चित्रपटाची कथा दमदार असते, तरीही तो बॉक्स ऑफिसवर चालत नाही. तर कधी कथेत दम नसतो, तरीही तो बॉक्स ऑफिसवर जादू दाखवण्यात यशस्वी ठरतो. पण बॉलिवूडमध्ये एक असेही दिग्दर्शक आहेत, ज्यांच्या चित्रपटात दमदार कथानकाची तर खात्री असतेच, शिवाय बॉक्स ऑफिसवरही 100 टक्के हिटचा रेकॉर्ड आहे. आजवर त्यांच्या नावावर एकही फ्लॉपचा ठपका नाही.

advertisement
2/7
 राजकुमार हिराणी आज आपला 63 वा वाढदिवस साजरा करत आहेत. राजकुमार हिराणी हे बॉलिवूडमधील असे एकमेव दिग्दर्शक आहेत, ज्यांच्या नावावर आजवर एकही फ्लॉप चित्रपट नाही. बॉलिवूडमध्ये उत्कृष्ट चित्रपट बनवणे आणि तो हिट करणे प्रत्येकाला जमत नाही. पण राजकुमार हिराणी यांनी मात्र हे करुन दाखवलं आहे.

3/7
 राजकुमार हिराणी यांनी आजवर असंख्य चित्रपटांत लेखक आणि एडिटर म्हणून काम केलं आहे. पण त्यांच्या दिग्दर्शनातील सर्व 8 पैकी 8 चित्रपट बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरले आहेत.

4/7
 राजकुमार हिराणी यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात फिल्म एडिटर म्हणून केली. 90 च्या दशकात त्यांनी आपल्या फिल्मी प्रवासाची सुरुवात केली. द एट कॉलम अफेअर, जब प्यार किया तो डरना क्या, जज़्बात, मिशन कश्मीर आणि तेरे लिए यांसारख्या चित्रपटांचे त्यांनी एडिटिंग केले आणि त्यानंतर दिग्दर्शनात एन्ट्री केली.

5/7
 राजकुमार हिराणी यांनी 2003 मध्ये 'मुन्ना भाई एमबीबीएस' या चित्रपटाच्या माध्यमातून दिग्दर्शक म्हणून काम करायला सुरुवात केली. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दणदणीत कमाई केली होती. संजय दत्त आणि अरशद वारसी यांनी या चित्रपटात कमाल केली होती. पहिल्याच चित्रपटाला सुपरहिट बनवल्यानंतर 2006 मध्ये त्यांनी याच चित्रपटाचा सिक्वेल लगे रहो मुन्नाभाई बनवला, ज्यानेही बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला.

6/7
 राजकुमार हिराणी यांनी पुढे आमिर खानसोबत बॉलिवूडमधील सर्वात लोकप्रिय चित्रपटांपैकी एक असलेला 'थ्री इडियट्स' बनवला. या चित्रपटात आमिर खान, करीना कपूर, शरमन जोशी आणि आर. माधवन हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत होते. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आणि तो बॉलिवूड इतिहासातील सर्वात मोठ्या सुपरहिट चित्रपटांपैकी एक ठरला. 2014 मध्ये हिराणी यांनी आमिर खान आणि अनुष्का शर्मा यांची प्रमुख भूमिका असणारा पीके बनवला. हा चित्रपटही सुपरहिट ठरला.

7/7
 राजकुमार हिराणी यांचा 2018 मध्ये रिलीज झालेला 'संजू' हा चित्रपट त्या वर्षातील सर्वाधिक कमाई करणारा ठरला. त्यानंतर 2023 मध्ये त्यांना बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानसोबत 'डंकी' हा चित्रपट बनवला. बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट हिट ठरला होता. राजकुमार हिराणी हे असे दिग्दर्शक आहेत ज्यांच्या चित्रपटांच्या कथा बदलतात पण त्या कथा साकारणारे कलाकार मात्र तेच असतात. विशेष म्हणजे राजकुमार हिराणी यांच्या चित्रपटांसाठी हिरो-हिरोईन नव्हे तर बोमन इराणी यांनी लकी चार्म मानलं जातं. त्यांच्या सर्व चित्रपटांत बोमन इराणी यांनी महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत.

Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement