आजचं हवामान: स्वेटरसोबत छत्रीही ठेवा कारण शेकोटी विझणार, महाराष्ट्रावर पावसाचं संकट, IMD ने सांगितली तारीख

Last Updated:

महाराष्ट्रात थंडीची लाट आणि अवकाळी पावसाचं संकट, IMD ने यलो अलर्ट जारी केला. तमिळनाडू केरळमध्ये अतिवृष्टी, मच्छिमारांना बंगालचा उपसागर टाळण्याचा इशारा.

News18
News18
स्वेटरसोबत आता छत्रीही ठेवायची वेळ आली आहे. याचं कारण म्हणजे कडाक्याची हाडं गोठवणारी थंडी म्हणून तुम्ही शेकोटी लावली तर ती विझण्याची शक्यता आहे याचं कारण म्हणजे ज्याची भीती होती आता तेच होणार आहे. ऐन हिवाळ्यात अवकाळी पावसाचं पुन्हा एकदा संकट आलं आहे. दक्षिणेकडून महाराष्ट्राच्या दिशेनं सरकणाऱ्या वाऱ्यांमुळे हवामानात मोठे बदल होत आहे. पश्चिम बंगालच्या खाडीमध्ये तामिळनाडूच्या दिशेनं कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. त्याची तीव्रता वाढू शकते.
उत्तरेकडून थंड वारे
एका बाजूला कडाक्याची हाडं गोठवणाऱ्या थंडीचा कडाका, तर दुसऱ्या बाजूला अवकाळी पावसाचं संकट असं विचित्र वातावरण आहे. महाराष्ट्रातील नागरिकांसाठी हवामान विभागाने (IMD) आज एक महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे. मध्य महाराष्ट्रातील काही भागांमध्ये आजही थंडीची लाट कायम राहणार आहे. मध्य प्रदेशातून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात आजही यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
advertisement
आज आणि उद्या गारठा कायम
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मागील २४ तासांत मध्य महाराष्ट्रात भीषण थंडीच्या लाटेची नोंद करण्यात आली. आजही मध्य महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये थंडीचा जोर कायम राहील. तसेच, पुढील काही दिवसांत म्हणजेच २१ नोव्हेंबरलाही मध्य महाराष्ट्राच्या एकाद ठिकाणी पुन्हा थंडीची लाट येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांनी सकाळ-संध्याकाळच्या वेळेस गरम कपड्यांचा आधार घ्यावा, असे आवाहन करण्यात येत आहे.
advertisement
IMD ने अवकाळी पावसाची तारीख सांगितली
तापमानाचा पारा 5 डिग्रीने खाली घसरण्याची शक्यता आहे. तर 22 ते 30 नोव्हेंबर वादळामुळे अवकाळी पावसाचं संकट कायम आहे. महाराष्ट्रात थंडीचा कडाका असताना, दक्षिण भारतात मात्र परिस्थिती पूर्णपणे उलट आहे. तमिळनाडूमध्ये १९ नोव्हेंबरला २३ सेंटीमीटरपर्यंत अतिवृष्टी झाली असून, तमिळनाडू आणि केरळमध्ये २० ते २५ नोव्हेंबरपर्यंत विविध दिवशी जोरदार पाऊस सुरू राहण्याची शक्यता आहे.
advertisement
अवकाळीमुळे तापमान वाढणार?
सध्याचा गारठा कायम असला तरी, महाराष्ट्रातील नागरिकांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, पुढील पाच दिवसांदरम्यान महाराष्ट्रातील किमान तापमानात २ ते ४ अंश सेल्सिअसने हळूहळू वाढ होण्याची शक्यता आहे. यामुळे थंडीच्या तीव्र लाटेतून लवकरच दिलासा मिळण्याची चिन्हे आहेत.
पश्चिम बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा
२२ नोव्हेंबरच्या आसपास आग्नेय बंगालच्या उपसागरावर एक नवीन कमी दाबाचा पट्टा तयार होण्याची शक्यता आहे. यानंतर, हा पट्टा Depression मध्ये रूपांतरित होण्याची शक्यता आहे. तो पश्चिम-वायव्य दिशेने पुढे सरकण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे मच्छिमारांनी पुढील पाच दिवस बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्राच्या दक्षिणेकडील भागांत मासेमारीसाठी जाऊ नये, असा स्पष्ट इशारा देण्यात आला आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
आजचं हवामान: स्वेटरसोबत छत्रीही ठेवा कारण शेकोटी विझणार, महाराष्ट्रावर पावसाचं संकट, IMD ने सांगितली तारीख
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement