Asha Movie Collection : रिंकू राजगुरूच्या आशा सिनेमाची सर्वत्र चर्चा, पहिल्या दिवशी किती केलं कलेक्शन?

Last Updated:
रिंकू राजगुरूच्या 'आशा' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमाई केली. आशा सेविकांच्या आयुष्यावर आधारित या चित्रपटातील तिच्या अभिनयाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
1/8
मराठी अभिनेत्री रिंकू राजगुरू हिचा बहुप्रतिक्षित 'आशा' हा सिनेमा 19 डिसेंबरला रिलीज झाला आहे. या सिनेमाची सर्वत्र चर्चा होती. आशा सेविकांच्या आयुष्यावर हा सिनेमा आधारित आहे.

advertisement
2/8
'आशा' या सिनेमात रिंकू राजगुरूने आशा सेविकेची भूमिका साकारली आहे. या भूमिकेसाठी तिने घेतलेली मेहनत, तिचा साधा लूक आणि अभिनयातील प्रामाणिकपणा प्रेक्षकांना भावत आहे.

3/8
ग्रामीण भागातील काम करणाऱ्या आशा सेविका आणि दररोजच्या आयुष्यात येणाऱ्या अडचणी, त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात सहन कराव्या लागणाऱ्या अनेक गोष्टींचं चित्रण सिनेमात करण्यात आलं आहे. 

4/8
सैराटनंतर रिंकू राजगुरूचा एक वेगळा सिनेमा असल्याचं बोललं जात आहे.  अनेकांनी रिंकूच्या अभिनयाचं कौतुक केलं आहे. रिंकूला या सिनेमासाठी सर्वोत्कष्ट अभिनयाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. 

5/8
सर्वत्र चर्चा असलेल्या रिंकूच्या आशा सिनेमानं पहिल्या दिवशी किती कमाई केली? Sacnilk च्या रिपोर्टनुसार, 'आशा' सिनेमानं रिलीजच्या पहिल्या दिवशी 7 लाख रुपयांची कमाई केली आहे.

6/8
मराठी सिनेमाच्या तुलनेत हा आकडा फार मोठा नसला तरी हा सिनेमा वेगळ्या विषयावर आधारित आहे. 

7/8
आता येत्या वीकेंडमध्ये सिनेमाच्या कमाईत वाढ होण्याची शक्यता आहे. विकेंडला सिनेमा किती कमाई करतोय याकडे सर्वांचं लक्ष आहे.

8/8
'सैराट'नंतर वेगवेगळ्या भूमिका स्वीकारत स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या रिंकू राजगुरूसाठी 'आशा' हा सिनेमा महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे. पुढील काही दिवसांत 'आशा' बॉक्स ऑफिसवर किती प्रभाव टाकतो हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.

Gold Silver Price Today : सामान्य ग्राहकांना दिलासा! सोनं-चांदीच्या दरात घसरण, पटापट चेक करा आजचा दर...
सामान्य ग्राहकांना दिलासा! सोनं-चांदीच्या दरात घसरण, पटापट चेक करा आजचा दर...
  • सामान्य ग्राहकांना दिलासा! सोनं-चांदीच्या दरात घसरण, पटापट चेक करा आजचा दर...

View All
advertisement