Samantha Marriage : डिवोर्सच्या 4 वर्षांनी समांथा दुसऱ्यांदा लग्नबंधनात! बनली 'फॅमिली मॅन'ची बायको
- Published by:Minal Gurav
Last Updated:
नॅशनल क्रश अभिनेत्री समांथा रूथ प्रभू हिने दुसरं लग्न केलं आहे. नागा चैतन्यबरोबर डिवोर्स झाल्याच्या 4 वर्षांनी समांथाने तिच्या आयुष्याची नवी सुरुवात केली आहे.
advertisement
advertisement
समांथा आणि राज निदिमोरू यांच्या अफेअरच्या चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरू होत्या. समांथाच्या आयुष्यातील अनेक महत्त्वाच्या प्रसंगांना राजची हजेरी असल्याचं पाहायला मिळालं होतं. समांथा रूथ प्रभू आणि राज निदिमोरू यांनी त्यांच्या लग्नाची अधिकृत माहिती दिलेली नाही. मात्र या वृत्तानंतर यांच्या लग्नाची बातमी चित्रपटसृष्टीत चर्चेचा विषय बनली आहे.
advertisement
advertisement
टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, राज निदिमोरू हे एक भारतीय चित्रपट निर्माते, पटकथा लेखक आणि निर्माता आहेत. तो आणि कृष्णा डीके हे राज अँड डीके म्हणून ओळखला जातो. ते त्यांच्या क्रिएटिव्ह कंटेंटसाठी ओळखले जातात. 'द फॅमिली मॅन' ही त्याची सीरिज खूप लोकप्रिय झाली. 'द फॅमिली मॅन'चा तिसरा सीझन नुकताच रिलीज झाला आहे. ही सीरिज देशातील नंबर वन स्पाय ड्रामा मालिका म्हणून ओळखली जाते.
advertisement
advertisement


