advertisement

Santosh Juvekar : काम किती, बोलतो किती म्हणणाऱ्यांना संतोष जुवेकरने चांगलंच सुनावलं, म्हणाला, 'मी बोलणार...'

Last Updated:
santosh juvekar reply to trollers : काम किती, बोलतो किती म्हणत अभिनेता संतोष जुवेकरला छावा सिनेमातील भूमिकेवरून ट्रोल करण्यात आलं. या ट्रोलिंगवर अखेर संतोषने मौन सोडलं आहे. संतोष नेमकं काय म्हणाला पाहूयात.
1/9
अक्षय खन्ना कुठे मुलाखती देत नाही पण कमी स्क्रिन टाइम असूनही संतोष जुवेकर मुलाखती देतोय, असं म्हणत त्याला ट्रोल करण्यात आलं. Focused इंडियन या युट्यूब चॅनेलशी बोलताना यावर उत्तर देत संतोष म्हणाला, "अक्षय खन्ना माझ्यासाठी तेवढाच मोठा अभिनेता आहे. लोक अर्धवट ऐकतात. लोक पूर्ण ऐकत नाही. माझं इंटेन्शन चुकीचं गेलं.

2/9
 तो ( अक्षय खन्ना ) मुलाखत देत नाही, तो सोशल मीडियावर येत नाही, तो प्रमोशनला येत नाही. तो त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. तो करत नाही म्हणून मी करायचं नाही का? मी करतो म्हणून त्याने करायचं नाही का?

3/9
"हा त्याच्या त्याच्या वैयक्तिक प्रश्न आहे.तो मोठा अ‍ॅक्टर आहे आणि त्याला गरज नाहीये रे, आम्ही बिचारे गबीर आहोत रे, आम्ही स्ट्रगलर्स आहोत. आम्हाला गरज आहे आमचं पीआर होणं."

4/9
संतोष पुढे म्हणाला, "मराठीतील सगळ्या मीडियाचे मी मनापासून आभार मानतो. पीआर करण्यासाठी खूप पैसे खर्च करावे लागतात पण मी एक पैसा देखील खर्च केलेला नाही. मराठी अभिनेता आहे, एवढ्या मोठ्या सिनेमात आहेत म्हणून त्यांनी माझे इंटरव्ह्यू केलेत. मलाही ते करावंस वाटलं."

5/9
"मला ट्रोल करण्यात आलं. हा बोलतो किती, याचं काम किती? त्यांना मी सांगेन, मी बोलणार, मी त्या सिनेमात असा डोकावून जरी गेलो असतो ना तरी बोललो असतो."

6/9
संतोष पुढे म्हणाला, "छावा सिनेमात काम करणं, त्याचा एक भाग असणं ही आज माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. माझं नशीब आहे. फार लोकांना मिळत नाही. ज्या लोकांना मिळालं त्यातील मी एक आहे."

7/9
संपूर्ण सिनेमात संतोष जुवेकर अक्षय खन्नाशी बोलायला गेला नाही यावरूनही त्याला ट्रोल करण्यात आलं. यावर उत्तर देत संतोष म्हणाला, "कलाकार इतके आत्मियतेनं काम करतात. लोकांना त्याची चीड येतो, तो तोच व्यक्ती आहे असं वाटतं. अक्षय खन्नाने खूप छान काम केलं आहे. पण माझी माझ्या महाराजांवर एक आस्था आहे, माझी निस्सीम भक्ती आहे. पुस्तक वाचल्यानंतर जो इतिहास मला कळला आहे, मी वाचलाय, मी ऐकलाय त्याचा एक इम्पॅक्ट माझ्यावर आहे, त्यामुळे थोडासा राग येणं सहाजिक आहे."

8/9
"आज जे ट्रोल करणारे आहेत त्यातील एक असता तर त्याने सुद्ध असं केलं असतं मला खात्री आहे. पण याचा अर्थ अक्षय खन्ना वाईट आहे असा होत नाही."

9/9
संतोष पुढे म्हणाला, "मी गेलो होतो त्यांना ( अक्षय खन्ना ) भेटायला, तो त्या गेटअपमध्ये होता. पण मला असं वाटलं त्या क्षणी की नको भेटायला. मी त्याला भेटणारच नाही असा माझा एटिट्यूट नव्हता. मी आत गेलो, मी त्याला पाहिलं आणि मला ते बघवत नव्हतं."

PBKS vs GT : आयपीएलच्या इतिहासातली सर्वांत मोठी चूक, 19.5 व्या बॉलला काय घडलं? विश्वास बसणार नाही असा ड्रामा
आयपीएलच्या इतिहासातली सर्वांत मोठी चूक, 19.5 व्या बॉलला काय घडलं? विश्वास बसणार नाही असा ड्रामा
  • आयपीएलमध्ये पहिल्यांदाच असं घडलं

  • शेवटच्या ओव्हरला काय घडलं

  • सोशल मीडियावर प्रचंड टीका

View All
advertisement